शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही- राहुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 13:36 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन राहुल गांधी आक्रमक

नवी दिल्ली: जोपर्यंत देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत पंतप्रधान मोदींना झोपू देणार नाही, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं. आतापर्यंत मोदींनी शेतकऱ्यांचं एक रुपयाचं कर्जही माफ केलेलं नाही, असं राहुल प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काल काँग्रेस नेत्यांचे मुख्यमंत्रीपदाचे शपथविधी संपन्न झाले. यानंतर अवघ्या काही तासातच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अवघ्या काही तासांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. यावरुन राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. 'काल काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा निर्णय घ्यायला त्यांना सहा तासदेखील लागले नाहीत. मात्र मोदी साडेचार वर्षांपासून पंतप्रधान आहेत. त्यांनी या काळात शेतकऱ्यांचं एक रुपयाचंही कर्ज माफ केलेलं नाही,' अशा शब्दांमध्ये राहुल मोदींवर बरसले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील काँग्रेसचा विजय हा गरीब जनतेचा, तरुणांचा, मजुरांचा, शेतकऱ्यांचा विजय आहे, असं राहुल यांनी म्हटलं. राहुल यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन मोदींना थेट लक्ष्य केलं. 'मोदींनी देशाला दोन भागांमध्ये विभागलं आहे. यातील एका भागात फक्त 15 जण आहेत. यामध्ये मोदींचे लाडके उद्योगपती आहेत. त्यांचं कर्ज लगेच माफ होतं. मात्र दुसऱ्या भारतात असलेल्या सर्वसामान्य जनतेला काही मिळत नाही. शेतकऱ्यांचा एक रुपयादेखील माफ होत नाही. मात्र जोपर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही,' असा इशारा राहुल यांनी दिला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशChhattisgarhछत्तीसगडRafale Dealराफेल डील