शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग! पायलट राहुल गांधींना भेटले तर सोनिया गांधींची गहलोत यांच्याशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 08:46 IST

Congress politics : चार दिवसांपूर्वी पीसीसीचे माजी प्रमुख सचिन पायलट यांनी (Sachin Pilot) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती.

ठळक मुद्दे सचिन पायलट आणि राहुल गांधी यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाल्याचे सांगितले जाते. सोनिया गांधी यांनी अशोक गेहलोत यांच्याशी राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचे बोलले जात आहे.

जयपूर : पंजाबमधील राजकीय घडामोडींनंतर (Punjab political crisis) आता राजस्थानमध्ये (Rajasthan) वेगाने सुरू असलेल्या राजकीय हालचालींदरम्यान सूत्रांच्या हवाल्याने एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) से यांच्याशी दूरध्वनीद्वारे राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

चार दिवसांपूर्वी पीसीसीचे माजी प्रमुख सचिन पायलट यांनी (Sachin Pilot) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता राजकीय विश्लेषक या चर्चा आणि भेटीला राज्यातील नवीन राजकीय समीकरणांचे संकेत मानत आहेत. पंजाबमधील घडामोडींनंतर राजस्थान आणि छत्तीसगडमधील राजकीय परिस्थितीवर लोकांचे लक्ष आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी सोनिया गांधी यांनी अशोक गहलोत यांच्याशी राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारासह संघटनेच्या मुद्यावरही चर्चा झाली आहे. 

दरम्यान, या चर्चेच्या तीन दिवस आधी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी सचिन पायलट यांनी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली होती. सचिन पायलट आणि राहुल गांधी यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाल्याचे सांगितले जाते. पंजाबमधील घडामोडींनंतर सध्याच्या परिस्थितीत सचिन पायलट आणि राहुल गांधी यांची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जवळजवळ वर्षानंतर दोघांची भेट झाली.

मंत्रिमंडळ आणि पक्ष संघटनेत बदल होण्याची शक्यताराहुल गांधी आणि सचिन पायलट यांच्या या बैठकीत राजस्थानच्या राजकीय परिस्थितीसह तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. सूत्रांचा दावा आहे की, दोघांच्या बैठकीत राजस्थानमधील पक्ष संघटना आणि मंत्रिमंडळातील बदल आणि सचिन पायलट यांची स्वतःची भूमिका यावर चर्चा झाली. पुढील महिन्यापर्यंत मंत्रिमंडळ आणि संघटनेत बदल होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच, हे सर्व आधीच निश्चित असल्याचे सांगितले जात आहे.

आचार्य प्रमोद कृष्णन यांचे ट्विटकाँग्रेस पार्टी फक्त मुख्यमंत्री अशोक गहलोत हे बरे होण्याची वाट पाहत आहे. अशोक गहलोत यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून ते पुन्हा आपल्या कामात सक्रीय झाले आहेत. या सर्व घडामोडींमध्ये प्रियंका गांधींचे निकटवर्तीय समजले जाणारे आचार्य प्रमोद कृष्णन यांनीही ट्विट करून त्यात भर घातली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, पंजाबचे वारे राजस्थान आणि छत्तीसगडमधील हवामान खराब करू शकतात.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान