Congress on India-America Trade Deal : अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर आज अखेर भारत आणि अमेरिकेतील व्यापार कराराची (ट्रेड डील) घोषणा झाली. या कराराअंतर्गत भारतावरील सुमारे 32 टक्के टॅरिफ कमी करण्यात आला आहे. दरम्यान, या करारावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. या कराराच्या अटी आणि परिणामांबाबत काँग्रेसने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
पीएम मोदींच्या विनंतीवरून करार झाला?
काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, भारत-पाकिस्तानातील युद्धविरामाप्रमाणे या व्यापार कराराची घोषणाही भारत सरकारऐवजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांनी हा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विनंतीवरून केल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.
भारतीय बाजार पूर्णपणे अमेरिकेसाठी खुला?
पोस्टमध्ये पुढे म्हटले की, ट्रम्प यांच्या विधानानुसार भारत अमेरिका परस्परविरोधी करासह इतर अडथळे शून्यावर आणणार आहे. याचा थेट परिणाम भारतीय उद्योग, व्यापारी आणि शेतकऱ्यांवर होऊ शकतो, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
कृषी क्षेत्रावरही धोका?
या करारात भारतीय कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी खुले करण्याचा उल्लेख असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. नेमका करार काय आहे? देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण कसे केले? असा थेट सवाल काँग्रेसने सरकारला विचारला आहे.
रशियाकडून तेल खरेदी थांबवणार?
काँग्रेसने आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत विचारले आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवून अमेरिका आणि वेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्यास सहमत झाला आहे का? जर तसे असेल, तर तो भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणावर मोठा आघात ठरेल. अमेरिकेकडून अधिक वस्तू खरेदी करण्याच्या चर्चेमुळे ‘मेक इन इंडिया’ धोरणाचे काय होणार? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
संसदेत माहिती देण्याची मागणी
काँग्रेसने स्पष्टपणे म्हटले की, भारताला या व्यापार कराराचे संपूर्ण तपशील जाणून घेण्याचा अधिकार आहे. मोदी सरकारने संसदेला आणि देशाला विश्वासात घेऊन कराराच्या सर्व अटी सार्वजनिक कराव्यात.
Web Summary : Congress questions the India-US trade deal, highlighting concerns about its impact on Indian farmers, industries, and foreign policy, particularly regarding potential shifts in oil purchasing from Russia to the US and Venezuela. They demand transparency.
Web Summary : कांग्रेस ने भारत-अमेरिका व्यापार समझौते पर सवाल उठाए हैं, जिसमें भारतीय किसानों, उद्योगों और विदेश नीति पर पड़ने वाले प्रभावों पर चिंता व्यक्त की गई है, खासकर रूस से तेल खरीद को अमेरिका और वेनेजुएला में बदलने की संभावना पर। पारदर्शिता की मांग।