शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अमेठी, रायबरेलीत एकतरी बूथ जिंकून दाखवा; अमित शहांना काँग्रेसचं खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 16:32 IST

'शहा अपयशी ठरल्यास त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा'

अमेठी: नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशातील कैराना आणि नुरपूर पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव केल्यानं विरोधकांचं मनोबल उंचावलं आहे. भाजपाला 2019 मध्ये केंद्रातील सत्ता राखायची असल्यास, उत्तर प्रदेशातील कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारानं थेट भाजपा अध्यक्ष अमित शहांना खुलं आव्हान दिलं आहे. 'अमेठी, रायबरेली मतदारसंघ जिंकणं दूरच, या मतदारसंघातील एकतरी बूथ जिंकून दाखवा,' असं आव्हान काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार दीपक सिंह यांनी शहांना दिलं आहे. दीपक सिंह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. 

काही दिवसांपूर्वीच अमित शहांनी काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या अमेठी आणि रायबरेलीवरुन काँग्रेसवर निशाणा साधला होता. येत्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपा विजयी होईल, असं शहांनी म्हटलं होतं. राहुल गांधी अमेठी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. तर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार आहेत. अमेठी आणि रायबरेलीवर भाष्य करत अमित शहांनी थेट राहुल आणि सोनिया गांधींना आव्हान दिलं होतं. शहांनी दिलेल्या या आव्हानाला आता काँग्रेसनं प्रतिआव्हान दिलं आहे. काँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांनी ट्विट करत शहांना थेट आव्हान दिलं आहे. 'अमेठी-रायबरेलीमधील एक जागा अमित शहा भाजपाला जिंकून देणार आहेत? स्वप्न पाहणं वाईट नाही. मात्र शहांना मी आव्हान देतो की, त्यांनी अमेठी-रायबरेलीतील किमान एका बूथवर भाजपाला यश मिळवून द्यावं. अमित शहांनी एकतरी बूथ जिंकला, तर मी आमदारकीचा राजीनामा देईन आणि शहा अपयशी ठरले, तर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा,' असं आव्हान सिंह यांनी दिलं. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी