शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: हात लावाल, तर चामडी सोलू; काँग्रेस आमदाराची भाजपा कार्यकर्त्यांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 10:54 IST

जनसभेला संबोधित करताना काँग्रेस आमदाराचा भाजपाला इशारा

भोपाळ: मध्य प्रदेशमधले काँग्रेसआमदार विजय चौरे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये विजय चौरे भाजपा कार्यकर्त्यांना धमकी देताना दिसत आहे. चौरे यांचा व्हिडीओ छिंदवाडातल्या सौसरमधला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना हात लावण्याचा प्रयत्न केल्यास चामडी सोलून काढण्यासही मागे पुढे पाहणार नाही, अशी उघड उघड धमकी चौरे यांनी दिली आहे. छिंडवाडातल्या सौसरमध्ये काल एका सभेला संबोधित करताना काँग्रेस आमदार विजय चौरे यांनी वादग्रस्त विधान केलं. राज्यातले भाजपा नेते परिस्थिती बिघडवण्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावण्याचा प्रयत्न केलात, तर चामडी सोलून काढू, अशी थेट आणि स्पष्ट धमकी त्यांनी भाजपाला दिली.  'राज्यातल्या काँग्रेस सरकारनं एक वर्ष पूर्ण केलं आहे. या एक वर्षाबद्दल बोलण्यासारखं त्यांच्याकडे (भाजपाकडे) काही नाही. आमदार, खासदाराविरोधात बोलण्यासारखा मुद्दा त्यांच्याकडे नाही. मुख्यमंत्री, सरकारविरोधात बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही. सरकारनं एक वर्षात केलेली कामं सर्वांसमोर आहेत. त्यामुळे आता सौहार्दपूर्ण वातावरण खराब करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. शांततामय वातावरण बिघडवण्याचं काम भाजपाच्या लोकांनी ५-७ दिवसांत केलं. त्यांनी आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला.'नुकतेच भाजपाचे नेते इकडे येऊन गेले. लांबलचक भाषण देऊन गेले. मूर्ती कोणी तोडली याचा शोध घेण्यासाठी तहसीलदाराचे कॉल रेकॉर्ड तपासा, असं माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. मी त्यांचं स्वागत करतो. आम्ही सगळ्या गोष्टींसाठी तयार आहोत. आम्ही काँग्रेसची मंडळी आहोत. कोणत्याही अवैध, अनैतिक कामांमध्ये आमचा सहभाग नाही. अवैध कामं तुम्ही करता आणि बदनाम मात्र काँग्रेसच्या मंडळींना करता. आता आम्ही हे सहन करणार नाही, हे लक्षात ठेवा. आमच्या कार्यकर्त्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केलात, त्याच्या केसाला जरी धक्का लावण्याचा प्रयत्न केलात, तर सार्वजनिक सभेतून सांगतोय, त्याची चामडी सोलून काढण्यासही आम्ही मागे पुढे पाहणार नाही,' अशी धमकी त्यांनी दिली.

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशMLAआमदारBJPभाजपा