शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या दोन आमदारांवर दारू पिऊन ट्रेनमध्ये महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याचा आरोप, एफआयआर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 17:00 IST

धावत्या ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी काँग्रेसच्या दोन आमदारांविरुद्ध विनयभंगाच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशातील सागरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. याठिकाणी काँग्रेसच्या दोन आमदारांवर धावत्या ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, धावत्या ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी काँग्रेसच्या दोन आमदारांविरुद्ध विनयभंगाच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या या दोन्ही आमदारांवर दारूच्या नशेत विनयभंग केल्याचा आरोप आहे.

यासंदर्भात सागर जीआरपी स्टेशन प्रभारी प्रमोद अहिरवार यांनी सांगितले की, रेवांचल एक्स्प्रेसमधील महिला प्रवासी रेवाहून भोपाळला जात होती. यादरम्यान, काही लोक महिला प्रवाशासोबत गैरवर्तन करत असल्याची माहिती सागर जीआरपी यांना मिळाली. यानंतर सागर जीआरपीची एक महिला अधिकारी आणि दोन पुरुष अधिकारी सागर येथून ट्रेनमध्ये चढले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

प्रमोद अहिरवार यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना सागरच्या आधी सांगितली जात आहे. ते म्हणाले की, आमच्या कर्मचाऱ्यांनी धावत्या ट्रेनमधील महिलेची तक्रार ऐकली आणि संपूर्ण घटनेची लेखी नोंद केली. तसेच, तक्रार कॉपीच्या आधारे आमदार सिद्धार्थ कुशवाह आणि सुनील सराफ यांच्या विरोधात विनयभंगाच्या कलमाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे प्रमोद अहिरवार यांनी सांगितले.

आमदारांवर दारूच्या नशेत असल्याचा गंभीर आरोपरेवांचल एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी सतना येथील काँग्रेस आमदार सिद्धार्थ कुशवाह, कोतमाचे आमदार सुनील सराफ यांच्यावर अनेक आरोप झाले आहेत. या दोन्ही आमदारांवर दारूच्या नशेत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, हे प्रकरण सागरचे आहे, सागर जीआरपी त्यावर कारवाई करत आहे, असे भोपाळ जीआरपी एसपी हितेश चौधरी यांनी सांगितले. 

संपूर्ण प्रकरणावरून राजकारण सुरूयाप्रकरणी भोपाळ आणि हबीबगंज जीआरपी पोलिसांनी मदत केली. यासोबतच महिलेच्या पतीनेही ट्विट करून रेल्वेमंत्री आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली होती. आता या संपूर्ण प्रकरणावरून राजकारणही सुरू झाले आहे. मात्र, काँग्रेसच्या दोन्ही आमदारांनी स्वत: निर्दोष असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी