शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
2
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
3
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
4
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
5
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
7
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
8
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
9
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
10
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
11
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
12
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
13
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
14
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
15
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
16
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
17
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
18
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
19
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
20
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Crime: लैंगिक अत्याचार, नंतर जबरदस्तीने गर्भपात; काँग्रेसच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:25 IST

Rahul Mamkuttathil News: महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोपांखाली काँग्रेसचे निलंबित आमदार राहुल ममकूटथिल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काँग्रेसचे निलंबित आमदार राहुल ममकूटथिल यांच्याविरुद्ध एका महिलेने केलेल्या लैंगिक शोषण आणि तिच्या संमतीशिवाय गर्भपात करण्यास भाग पाडल्याच्या गंभीर आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित महिलेने गुरुवारी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त कळताच राहुल ममकूटथिल फरार झाले असून, पोलिसांनी त्यांचा कसून शोध सुरू केला आहे. हे प्रकरण केरळच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण करण्याची शक्यता आहे.

राहुल ममकूटथिल यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल ममकूटथिल यांचा मित्र जॉबी जोसेफ याच्यावरही पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा आरोप आहे आणि त्याच्याविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिरुवनंतपुरम शहर पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखालील एक विशेष पथक या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. पीडितेचा जबाब तिरुवनंतपुरमच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवला जाईल. तसेच डॉक्टरांचे एक पथक तिची वैद्यकीय तपासणी करेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुन्हा दाखल झाल्यापासून राहुल ममकूटथिल फरार असल्याचे वृत्त आहे. काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ममकूटथिल गुरुवारी संध्याकाळपर्यंत कानडी परिसरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रचार करत होते. परंतु, नंतर ते गायब झाले. ममकूटथिल हे केरळ युवा काँग्रेसचे राज्य अध्यक्ष होते. परंतु, बलात्काराच्या आरोपांमुळे आणि विरोधकांच्या तीव्र निषेधानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. राहुल ममकूटथिल यांच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक महिला आणि एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने बलात्काराचे आणि लैंगिक शोषणाचे आरोप दाखल केल्याची माहिती आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress MLA Booked for Rape, Forced Abortion; Flees After Complaint

Web Summary : Congress MLA Rahul Mamkootathil faces rape and forced abortion charges after a woman's complaint. He is now absconding. Police are investigating, and a medical examination of the victim is underway. He previously faced similar allegations and had resigned from his post.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcongressकाँग्रेसKeralaकेरळ