काँग्रेसच्या मंत्र्याचा प्रताप; कार्यकर्त्याला मारहाण करत काढले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 16:44 IST2019-12-31T16:41:37+5:302019-12-31T16:44:00+5:30
मुख्यमंत्री कमलनाथ सध्या राज्यात नाही. त्यामुळे त्यांच्या मंत्रीमंडळातील नेते आपआपल्या जिल्ह्यातील काम पाहात आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री पटवारी रिवा येथे एक दिवसाच्या दौऱ्यावर होते.

काँग्रेसच्या मंत्र्याचा प्रताप; कार्यकर्त्याला मारहाण करत काढले बाहेर
नवी दिल्ली - मध्ये प्रदेशातील कमलनाथ सरकारमध्ये क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री, उच्च शिक्षणमंत्री जीतू पटवारी कार्यकर्त्यांवर भडकल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते कार्यकर्त्याला मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ विरोधीपक्षनेत्याने ट्विटरवर शेअर केला आहे.
मंत्री पटवारी पत्रकार परिषद घेण्यासाठी एका खोलीत थांबले होते. यावेळी अनेक कार्यकर्ते त्या खोलीत शिरले. छोट्याशा रूममध्ये असलेले कार्यकर्ते बाहेर काढत असताना एकासोबत मंत्री पटवारी यांची धक्काबुक्की झाली. यामुळे संतापलेल्या पटवारी यांनी कार्यकर्त्याला लाथ मारली. तसेच त्याच्या पाठीवर धक्का देत त्याला बाहेर काढून दिले.
शांति, अनुशासन और कार्यकर्ताओं को प्रोत्साहित करने वाली कांग्रेस पार्टी का एक नजारा pic.twitter.com/qFMrvcVz02
— Gopal Bhargava (Leader of Opposition) (@bhargav_gopal) December 30, 2019
मुख्यमंत्री कमलनाथ सध्या राज्यात नाही. त्यामुळे त्यांच्या मंत्रीमंडळातील नेते आपआपल्या जिल्ह्यातील काम पाहात आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री पटवारी रिवा येथे एक दिवसाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रिवा विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. मात्र कार्यकर्ते घुसल्यामुळे येथे गोंधळ झाला. त्यानंतर नाराज झालेल्या पटवारी यांनी कार्यकर्त्यांना स्वत: बाहेर काढले. त्यावेळी एक कार्यकर्ता आणि पटवारी यांच्यात धक्काबुक्की झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.