शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

काँग्रेसने जाहीर केली 43 उमेदवारांची दुसरी यादी, कमलनाथ आणि गेहलोत यांच्या मुलांना तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 19:06 IST

काँग्रेसने सोमवारी भाजपमधून काँग्रेसमध्ये सामील झालेल्या राहुल कासवान यांनाही लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

Congress LokSabha 2024 List: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यत आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि दमण दीवमधील 43 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील हायप्रोफाईल जागा मानल्या जाणाऱ्या छिंदवाडा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांना तिकीट दिले आहे. तर, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांना जालोर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

पाहा काँग्रेसची दुसरी यादी

राजस्थानमधील उमेदवारराजस्थानमधील लोकसभेच्या 25 पैकी 10 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात जालोरमधून वैभव गेहलोत, बिकानेरमधून गोविंद मेघवाल, चुरुमधून राहुल कासवा, झुंझुनूमधून बृजेंद्र ओला, अलवरमधून ललित यादव, भरतपूरमधून संजना जाटव, टोंकमधून हरीश मीना, जोधपूरमधून करणसिंग उचियाराडा, उदयपूरमधून ताराचंद मीना आणि चित्तौडमधून उदयलाल अंजाना यांना उमेदवारी दिली आहे.

मध्य प्रदेशातील उमेदवार मध्य प्रदेशातील ज्या 10 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत, त्यामध्ये छिंदवाडामधून नकुलनाथ, भिंडमधून फूलसिंग बरैया, टिकमगडमधून पंकच अहिरवार, सतनामधून सिद्धार्थ कुशवाह, सिधीमधून कमलेश्वर पटेल, मंडलामधून ओंकार सिंग मरकाम, देवासमधून राजेंद्र मालवीय, धारमधून राधेश्याम मुवेल, खरगोनमधून पोरलाल खर्ते, बैतूलमधून रामू टेकाम यांना तिकीट मिळाले आहे.

आसाममधील 14 पैकी 12 जागांसाठी उमेदवार जाहीरकाँग्रेसने आसाममधील लोकसभेच्या 12 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कोक्राझारमधून गर्जन मश्रे, धुबरीतून रकीबुल हसन, बारपेटामधून दीप बयान, दारा उदलगुरीमधून माधब राजवंशी, गुवाहाटीमधून मीरा बोरठाकूर गोस्वामी, दिपूमधून जयराम आंगलोंग, करीमगंजमधून हाफिज रशीद अहम चौधरी, सुराज्यातून सिलसिलेवार, नागावमधून बोरदोलोई, काझीरंगातून रोसेलिना टिर्के, सोनितपूरमधून प्रेमलाल गंजू आणि जोरहाटमधून गौरव गोगोई यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

उत्तराखंडच्या ती उमेदवारांची घोषणाउत्तराखंडमधील चार जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार घोषित केले आहेत. टिहरी गढवालमधून जोतसिंग गुंटसोला, गढवालमधून गणेश गोदियाल आणि अल्मोडामधून प्रदीप टमटा यांचा समावेश आहे. तर दमण आणि दीवमध्ये केतन दह्याभाई पटेल यांना तिकीट देण्यात आले आहे.

गुजरातमध्ये 7 जागांसाठी उमेदवार जाहीरकाँग्रेसने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत गुजरातमधील 26 पैकी 7 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. पक्षाने कच्छमधून नितीश भाई लालन, बनस्कांठामधून गेनीबेन ठाकोर, अहमदाबाद पूर्वमधून रोहन गुप्ता, अहमदाबाद पश्चिममधून भरत मकवाना, पोरबंदरमधून ललित भाई वसोया, बारडोलीमधून सिद्धार्थ चौधरी, वलसाडमधून अनंत भाई पटेल यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसने या यादीत 7 जनरल, 13 ओबीसी, 10 एससी, 9 एसटी आणि एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशGujaratगुजरातAssamआसाम