शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वह हृदय नहीं है पत्थर है, जिस...; राहुल गांधींचा कविता शेअर करत मोदींवर हल्लाबोल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 18:18 IST

कोरोना काळात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर सातत्याने हल्ले चढवत आहेत. ते कधी लशींच्या निर्यातीवरून, तर कधी ऑक्सिजनच्या कमतरतेवरून सरकारवर तोफा डागत आहेत. (Rahul gandhi)

नवी दिल्ली - कोरोना काळात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर सातत्याने हल्ले चढवत आहेत. ते कधी लशींच्या निर्यातीवरून, तर कधी ऑक्सिजनच्या कमतरतेवरून सरकारवर तोफा डागत आहेत. यातच राहुल गांधींनी आता पुन्हा एकदा सरकार आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी कवितेच्या ओळी शेअर करत म्हटले आहे : "जो भरा नहीं है भावों से,जो दर्द सुनने को तैयार नहीं,वह हृदय नहीं है पत्थर है,जिस ‘सिस्टम’ को जन से प्यार नहीं!"

Corona Vaccine: ही लक्षणं सांगतात, तुमच्या शरीरात काम करतेय कोरोना लस! पण, लक्षणं नसतील तर...?

तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी एक दिवस आधीच सरकारवर हल्ला चढवताना या सरकारला आंधळी सिस्टिम असे म्हटले होते. राहुल गांधींनी ट्विट करत लिहिले होते, "एक-मेकांची मदत करताना सामान्य लोक दिसतात, कुणाच्या हृदयाला स्पर्श करण्यासाठी हाताला स्पर्श करण्याची आवश्यकता नाही. मदतीचा हात देत चला. या आंधळ्या ‘सिस्टिम’चे वास्तव दाखवत चला." राहुल गांधींनी यापूर्वी सेंट्रल विस्ता प्रोजेक्टसंदर्भातही प्रश्न उपस्थित केले होते. (Congress leaer Rahul gandhi attacked without naming pm modi said he is not a heart it is a stone)

देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे रुग्ण -देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. तर 2,69,507 बरे झाले आहेत. काल देशात 3,60,960 कोरोनाबाधित सापडले होते. आज यात जवळपास 18 हजारांनी वाढ झाली आहे. तर मृतांच्या आकड्यातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाने 3645 जणांचा बळी घेतला आहे. काल मृतांचा आकडा 3293 एवढा होता. यामध्ये आज जवळपास 350 मृतांची वाढ झाली आहे. आता, देशात एकूण मृतांचा आकडा 2,04,832 झाला असून सध्या 30,84,814 रुग्ण उपचार घेत आहेत. आजवर एकूण 1,83,76,524 रुग्ण सापडले असून यापैकी 1,50,86,878  रुग्ण बरे झाले आहेत. लसीकरणाचा आकडा 15,00,20,648 वर गेला आहे. 

CoronaVirus: कोरोनावर बड्या-बड्या देशांना जमला नाही, असा करिश्मा छोट्याशा भूटाननं करून दाखवला; बघा, कसा?

चार धाम यात्रा स्थगित -देशातील कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर चार धाम यात्राही स्थगित करण्यात आली आहे. ही यात्रा 14 मेरोजी सुरू होणार होती. यात्रा स्थगित करण्यासंदर्भात उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी माहिती दिली. यात्रा रद्द करण्यासंदर्भात रावत म्हणाले, राज्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे यात्रा स्थगित करण्यात येत आहे. केवळ पुजाऱ्यांनाच तेथे पुजा करण्याची परवानगी असेल. संपूर्ण देशातील लोकांसाठी चार धाम यात्रा सध्यासाठी रद्द करण्यात येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी