काँग्रेस नेत्याला झोपेतून उठवून केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 04:48 IST2018-12-05T04:48:20+5:302018-12-05T04:48:40+5:30

काळजीवाहू मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सभेच्या वेळी निदर्शने करा आणि कोडगल हे शहर बंद ठेवा, असे आवाहन करणारे तेलंगणा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष रेवंथ रेड्डी यांना त्यांच्या घरी पहाटे घुसून पोलिसांनी अटक केली.

The Congress leader was picked up from sleep and arrested | काँग्रेस नेत्याला झोपेतून उठवून केली अटक

काँग्रेस नेत्याला झोपेतून उठवून केली अटक

हैदराबाद : काळजीवाहू मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सभेच्या वेळी निदर्शने करा आणि कोडगल हे शहर बंद ठेवा, असे आवाहन करणारे तेलंगणा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष रेवंथ रेड्डी यांना त्यांच्या घरी पहाटे घुसून पोलिसांनी अटक केली. या पोलिसांनी वॉरंट आणले नव्हते. रेवंथ रेड्डी यांच्याबरोबरच पोलिसांनी त्यांचा भाऊ, वैयक्तिक सशस्त्र सुरक्षा अधिकारी, बंगल्याचा सुरक्षारक्षक यांनाही पकडून नेले.
कोडगल शहरातील रेवंथ रेड्डी यांच्या घराला सुमारे ५00 पोलिसांनी घेरले. त्यानंतर काही पोलीस बंगल्यात घुसले, तेव्हा रेड्डी, त्यांच्या पत्नी व मुले बेडरुममध्ये झोपली होती. पोलिसांनी लाथ मारून बेडरुमचा दरवाजा तोडला व आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहोत, असे सांगितले. बेडरुममध्ये विनापरवानगी शिरणे तसेच दरवाजा तोडल्याबद्दल रेड्डी व त्यांच्या पत्नीने जाब विचारला, तेव्हा आम्हाला प्रश्न विचारू नका, आमच्याबरोबर चला, असे पोलिसांनी रेड्डी यांना सुनावले.

Web Title: The Congress leader was picked up from sleep and arrested