शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

रामचरितमानसचा कोणता भाग शिकलात?; मोदी अन् प्रभू रामांचा 'तो' फोटो पाहून थरूर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 5:58 PM

भाजपा नेत्याच्या ट्विटमुळे नवा वाद; शशी थरूर यांचा थेट सवाल

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन केलं. गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिराचा विषय भाजपाच्या अजेंड्यावर होता. अखेर आज राम मंदिराचा शिलान्यास सोहळा संपन्न झाला. त्या सोहळ्याला मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील संत उपस्थित होते. त्यामुळे अयोध्येत अतिशय मंगलमय वातावरण होतं. मात्र राम मंदिर भूमिपूजनासंदर्भात भाजपाच्या नेत्या शोभा करंदलाजे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे चांगलाच वाद झाला. भाजपा नेत्या शोभा करंदलाजे यांनी राम मंदिर भूमिपूजनासंदर्भात एक ट्विट केलं. त्यात पंतप्रधान मोदी आणि प्रभूरामचंद्राचं चित्र आहे. यामध्ये मोदी प्रभूरामांचं बोट धरून त्यांना मंदिराकडे नेताना दिसत आहे. या चित्रात मोदी मोठे आणि प्रभू राम यांना लहान दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांनी चित्रावर आक्षेप घेतला. मोदी प्रभू रामापेक्षा मोठे आहेत का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी एक ट्विट करत एक प्रश्न विचारला आहे. 'ना प्रेम सीखा है, ना त्याग सीखा है, ना करुणा सीखी है, ना अनुराग सीखा है, खुद को राम से बड़ा दिखाकर, खुश होने वालों तुमने, श्री रामचरितमानस का कौन सा भाग सीखा है?', असा प्रश्न थरूर यांनी उपस्थित केला आहे. थरूर यांच्याप्रमाणेच इतरांनीही शोभा यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

पंतप्रधान मोदींनी अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन केल्यानंतर अनेक नेत्यांनी ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गृहमंत्री अमित शहांनी आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक आणि गौरवपूर्ण असल्याचं म्हटलं. 'पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन आणि शिलान्यास संपन्न झाला. हा भारताच्या महान संस्कृतीमधील एक सुवर्णाध्याय आहे. ही एका नव्या युगाची सुरुवात आहे,' अशा भावना शहांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदीShashi Tharoorशशी थरूर