शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या शिक्षा स्थगितीसाठी अपील कुठे करायचे यावर खल; दिलासा मिळवण्यासाठी धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 10:08 IST

सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट की सुरत न्यायालय

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती मिळविण्यासाठी त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी व अन्य कायदेतज्ज्ञ प्रयत्नशील आहेत. या प्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागायची की सुरतच्या सत्र न्यायालयासमोर अपील करायचे यावर गांधी यांच्या वकिलांचा खल सुरू आहे. सत्र न्यायालयाने अपीलावर दिलासा न दिल्यास गुजरात उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याचाही विचार आहे. 

सुरतच्या न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावल्यामुळे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले. उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा न दिल्यास त्यांच्यापुढील अडचणी वाढणार आहेत. त्यांच्यावर विविध प्रकरणांत पाटणा, गुवाहाटी, मुंबई, झारखंड, लखनऊ, दिल्ली येथील न्यायालयांत सहाहून अधिक खटले सुरू आहेत. २०१५ पासून सुरू असलेले खटल्यांचा निकाल यावर्षी लागावा यासाठी संबंधित राज्ये प्रयत्नशील आहेत.

८ तुघलक लेन बंगला सोडावा लागण्याची शक्यता

काँग्रेस नेते राहुल गांधी हे ८ तुघलक लेन बंगल्यात राहात असून तो बंगला त्यांनी रिकामा करावा यासाठी केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्रालय हालचाली करण्याची शक्यता आहे. त्यांनी हा बंगला १५ दिवसांत रिकामा करावा असे त्यांना केंद्र सरकारकडून सांगण्यात येईल अशी चर्चा आहे.

वायनाडमध्ये पोटनिवडणूक होणार? 

वायनाडमध्ये पाेटनिवडणुकीची शक्यता आहे. विद्यमान लोकसभेची मुदत जून २०२४मध्ये संपणार आहे. लोकसभेची जागा रिक्त झाल्यावर एक वर्षांपेक्षा अधिक काळानंतर सार्वत्रिक निवडणूक होणार असेल तर त्या मतदारसंघात पोटनिवडणुक घेणे अनिवार्य आहे. राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला तरीही त्यांचे लोकसभा सदस्यत्व आपोआप बहाल होणार नाही. 

राहुल गांधींवरील काही प्रमुख खटले

मोदी आडनावाबद्दल जे उद्गार काढले त्याबाबतच त्यांच्यावर पाटणा येथेही खटला भरण्यात आला आहे. २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक गुंतली असल्याचा आरोप केल्याप्रकरणी  राहुल गांधी बँकेने त्यांच्यावर बदनामीचा खटला भरला.पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी भाजप-रा.स्व. संघ विचारसरणीचा संबंध जोडल्याबद्दल संघाच्या स्वयंसेवकाने राहुल गांधींवर बदनामीचा खटला दाखल केला. महात्मा गांधी यांची हत्या रा.स्व. संघाने केली, असा आरोप केल्यामुळे भिवंडी येथील न्यायालयात खटला दाखल आहे. ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांना डिसेंबर २०१५ मध्ये जामीन मंजूर झाला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCourtन्यायालयcongressकाँग्रेस