नरेंद्र मोदींना व्हाइट हाऊसेने अनफॉलो केल्याने राहुल गांधी निराश; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 08:27 AM2020-04-30T08:27:57+5:302020-04-30T08:28:30+5:30

व्हाइट हाऊसने नरेंद्र मोदी यांच्यासह भारताचे पाच महत्वाच्या ट्विटर हँडलला फॉलो करण्यास सुरुवात केली होती.

Congress leader Rahul Gandhi says I'm dismayed by the unfollowing of our President & PM by the White House mac | नरेंद्र मोदींना व्हाइट हाऊसेने अनफॉलो केल्याने राहुल गांधी निराश; म्हणाले...

नरेंद्र मोदींना व्हाइट हाऊसेने अनफॉलो केल्याने राहुल गांधी निराश; म्हणाले...

googlenewsNext

नवी दिल्ली: अमेरिकेतील व्हाइट हाऊसने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर फॉलो केले होते. मात्र आता पुन्हा नरेंद्र मोदींनाट्विटरवर अनफॉलो केले आहे. भारताने अमेरिकेला हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध देऊन मदतीचा हात पुढे केला होता. भारताच्या या मदतीनंतर व्हाइट हाऊसने नरेंद्र मोदी यांच्यासह भारताचे पाच महत्वाच्या ट्विटर हँडलला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. पंरतु आता पुन्हा सर्वांना अनफॉलो केले असल्याचे समोर आले आहे. भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन मदत केल्यानंतर अमेरिकेने भूमिका बदलल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियावर टीकाही करण्यात येत आहे. अमेरिकेच्या या भूमिकेवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील नाराजी दर्शवली आहे.

राहुल गांधी ट्विट करत म्हणाले की, व्हाइट हाऊसने पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना ट्विटरवरुन अनफॉलो केल्याने मी निराश झालो आहे. या सर्व प्रकरणाची परराष्ट्र मंत्रालय योग्य ती दखल घेईल अशी आशा राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.

व्हाइट हाऊस इतर कोणत्याही देशांच्या किंवा त्या देशातील प्रमुखांना ट्विटरवर फॉलो करत नाही. व्हाइट हाऊसने नरेंद्र मोदी यांच्यासह पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, भारताचे दूतावास आणि भारतातील अमेरिकेचे दूतावास यांना ट्विटरवर फॉलो करण्यास सुरुवात केली होती. मात्र पुन्हा अनफॉलो केल्यमुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. 

दरम्यान, कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला असून, त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी अमेरिकेला हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधाची गरज होती. तेव्हा अमेरिकेसह अन्य विविध देशांना भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध देऊन मदत केली होती. मात्र यानंतर देखील अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. तसेच हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषध निरुपयोगी ठतर असल्याचा दावा देखील अमेरिकेने केला होता. त्यामुळे हे औषध निरुपयोगी ठरल्यामुळे अमेरिकेने यू-टर्न घेतला की काय असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

Web Title: Congress leader Rahul Gandhi says I'm dismayed by the unfollowing of our President & PM by the White House mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.