शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

आरक्षण वाचवण्यासाठी राहुल गांधींचा 'अवतार'; काँग्रेसचा भाजपावर पोस्टर वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 13:02 IST

पोस्टरमधून काँग्रेसचा भाजपावर निशाणा; निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता

बिहार: विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना बिहारमध्ये पोस्टर वॉर सुरू झालं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचा आढावा घेण्याची गरज व्यक्त केली होती. त्याचा फटका भाजपाला निवडणुकीत बसला होता. आता पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकीआधी आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे.भाजपा आरक्षणविरोधी असून आरक्षण संपवण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसनं वारंवार केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील अनेकदा यावरुन भाजपाला लक्ष्य केलं आहे. यानंतर आता बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा विषय तापू लागला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाटण्यातल्या रस्त्यावर राहुल यांचे पोस्टर लावले आहेत. 'आरक्षण हटवू देणार नाही,' असा मजकूर या पोस्टरवर आहे. यामध्ये राहुल यांचा फोटो एखाद्या हिरोसारखा लावण्यात आला असून त्याखाली अवतार शब्द लिहिण्यात आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबद्दल केलेलं विधान भाजपाला महागात पडलं होतं. त्यामुळे आताही आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करुन भाजपाच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. बिहारच्या राजकारणात जातीचा, आरक्षणाचा मुद्दा कायमच संवेदनशील राहिला आहे. राज्यातले दोन महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल यांनी अनेकदा जातीवर आधारित जनगणना केली जावी, अशी मागणीदेखील केली आहे. आरक्षणाबद्दल काय म्हणाले आहेत राहुल गांधी?काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी नेहमीच आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपावर तोंडसुख घेतलं आहे. भाजपाला आरक्षण हटवायचं आहे. भाजपा संघाच्या डीएनएमध्येच आरक्षण विरोध आहे. मात्र आम्ही आरक्षण संपवू देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षण संपवण्याची कितीही स्वप्नं पाहिली, तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरक्षण संपू देणार नसल्याचं राहुल यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBiharबिहारcongressकाँग्रेसreservationआरक्षणBJPभाजपा