राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर, विमानतळावळ करावे लागले 2 तास वेटिंग; खासदारकीची आली आठवण, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 08:43 IST2023-05-31T08:42:51+5:302023-05-31T08:43:55+5:30
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमिग्रेशन क्लिअरन्ससाठी राहुल गांधी यांना तब्बल दोन तास विमानतळावर वाट पाहावी लागली.

राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर, विमानतळावळ करावे लागले 2 तास वेटिंग; खासदारकीची आली आठवण, म्हणाले...
काँग्रेस नेते तथा माजी खासदार राहुल गांधी सध्या अमेरिकेतील तीन शहरांच्या दौऱ्यावर आहेत. सॅन फ्रान्सिस्को येथे पोहोचल्यानंतर त्यांनी अनिवासी भारतीयांसोबत संवाद साधला. या दौऱ्यात ते अमेरिकन खासदारांचीही भेट घेणार आहेत. ते मंगळवारी रात्री अमेरिकेत पोहोचले. सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा आणि इतर आयओसी सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमिग्रेशन क्लिअरन्ससाठी राहुल गांधी यांना तब्बल दोन तास विमानतळावर वाट पाहावी लागली.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी इमिग्रेशन क्लिअरन्ससाठी रांगेत उभे होते. यावेळी फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेतली. दरम्यान, आपण रांगेत का उभे आहात? असा प्रश्न लोकांनी विचारला असता गांधी म्हणाले, "मी एक सामान्य माणूस आहे. मला हे आवडते. मी आता खासदार नाही."
विद्यार्थ्यांसोबत साधणार संवाद -
राहुल गांधी यांचा दौरा सॅन फ्रान्सिस्कोपासून सुरू झाला आहे. या दौऱ्यात ते स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतील. येथे राहुल गांधी पत्रकारांसोबतही संवाद साधणार आहेत. यानंतर, वॉशिंग्टन डीसीमध्ये खासदार आणि थिंक टँक सोबत त्यांची बैठकही आहे.
आपल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान काँग्रेस राहूल गांधी भारतीय-अमेरिकन लोकांनाही संबोधित करण्याची आणि वॉल स्ट्रीटचे अधिकारी तथा विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचीही शक्यता आहे. 4 जून रोजी न्यूयॉर्क येथील जाहीर सभेने त्यांचा दौरा संपेल. हा कार्यक्रम न्यूयॉर्क येथील जेविट्स सेंटरमध्ये होईल.