राहुल गांधींनी घेतली मोदी-अदानींचा मुखवटा लावलेल्या खासदारांची मुलाखत, विचारले असे प्रश्न; भाजप भडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 13:38 IST2024-12-10T13:37:31+5:302024-12-10T13:38:31+5:30
"त्यांना (काँग्रेस) देशातील उद्योगपती नको आहेत, परदेशातील उद्योगपती हवे आहेत. त्यांना जॉर्ज सोरोस हवा आहे, जो भारतात अस्थिरता निर्माण करेल..."

राहुल गांधींनी घेतली मोदी-अदानींचा मुखवटा लावलेल्या खासदारांची मुलाखत, विचारले असे प्रश्न; भाजप भडकला
अदानी लाच प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपमधील वाक्युद्ध आता नव्या पातळीवर पोहोचताना दिसत आहे. यासंदर्भात संसदेत चर्चेला परवानगी न दिल्याने नाराज काँग्रेसने सोमवारी (9 डिसेंबर 2024) विरोधाचा एक नवा मार्ग शोधून काढला. याची सध्या जबरदस्त चर्चा होताना दिसत आहे.
काँग्रेसने सोमवारी केंद्र सरकार आणि अदाणी समूहातील संबंधांसंदर्भातील आपल्या आरोपांचा पुनरुच्चार करत एक वीडियो तयार केला. हा व्हिडिओ संसदभवन परिसरात तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेस खासदार शिवाजी काळगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार मणिकम टागोर यांनी अदानी यांचा मुखवटा घातला होता. तर समोर उभे असलेले राहुल गांधी या दोघांना प्रश्न विचारत होते.
यह एक ख़ास और पुराना रिश्ता है! #ModiAdaniEkHaipic.twitter.com/s6iF1YeCcX
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 9, 2024
राहुल गांधींनी विचारले असे प्रश्न -
राहुल गांधी : आजकाल काय सुरू आहे भाऊ?
अदानींचा मुखवटा लावलेले खासदार : आजकाल मी जे बोलतो, हे करतात.
राहुल गांधी : आपण पुढे काय घेण्याच्या प्रयत्नात आहात?
अदानींचा मुखवटा लावलेले खासदार : काहीही वाटते, एअरपोर्ट हवे... काहीही हवे...
यावेळी अदानी यांचा मुखवटा घातलेले खासदाराने मोदींचा मुखवटा घातलेल्या खासदाराच्या पाठीवर थाप मारत, आज सायंकाळी आमची बैठक आहे. हा भाऊ आहे आपला.
राहुल गांधी : हे फारच सेरिअस वाटत आहेत, कमी बोलतात आजकाल...?
अदानींचा मुखवटा लावलेले खासदार : हे आजकाल थोडे टेन्शनमध्ये आहेत.
राहुल गांधी : आपली पार्टनरशिप केव्हापासून सुरू आहे?
अदानींचा मुखवटा लावलेले खासदार : मोदींचा मुखवटा लावलेल्या खासदाराचा हात पकडत म्हणाले, वर्षानुवर्षे.
भाजपचा पलटवार -
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपनेही काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. यावर बोलताना भाजप खासदार दिनेश शर्मा म्हणाले, "आज ज्येष्ठ नेते मुखवटा लावून संसदेत उभे आहेत आणि पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरत आहेत... त्यांना देशाच्या लोकशाहीचा आदर कसा करा हेच कळत नाही... काँग्रेस आता हताश, निराश, थकली आणि अस्तित्वहीन नेत्यांचा समूह बनली आहे. त्यांच्याशी संबंधित विरोधी पक्षही हळूहळू वेगळे होत आहेत. त्यांना देशातील उद्योगपती नको आहेत, परदेशातील उद्योगपती हवे आहेत. त्यांना जॉर्ज सोरोस हवा आहे, जो भारतात अस्थिरता निर्माण करेल.