शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

त्या विधानावरून राहुल गांधी यांनी कमलनाथ यांना सुनावले खडेबोल, म्हणाले...

By बाळकृष्ण परब | Updated: October 20, 2020 16:09 IST

Rahul Gandhi News : कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्याबाबत उच्चारलेल्या आक्षेपार्ह शब्दावरून राजकारण तापले आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या या वक्तव्याबाबत प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

ठळक मुद्देकमलनाथ माझ्या पक्षाचे आहेत. मात्र त्यांनी वापरलेली भाषा मला व्यक्तिगतरीत्या मान्य नाहीकुणीही असो मी अशा भाषेला अजिबात मान्य करणार नाहीदेशातील महिलांबाबत प्रत्येक पातळीवर आपल्या व्यवहारात सुधारणा होण्याची गरज आहे

वायनाड - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्याबाबत उच्चारलेल्या आक्षेपार्ह शब्दावरून राजकारण तापले आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या या वक्तव्याबाबत प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी या विधानाबाबत कमलनाथ यांना खडेबोल सुनावले आहेत. कमलनाथ यांनी ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर केला ती आपल्याला अजिबात मान्य नाही. ही घटना दुर्भाग्यपूर्ण आहे, असे विधान राहुल गांधी यांनी केले आहे.केरळमधील वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींना पत्रकार परिषदेदरम्यान, कमलनाथ यांच्या आक्षेपार्ह विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, कमलनाथ माझ्या पक्षाचे आहेत. मात्र त्यांनी वापरलेली भाषा मला व्यक्तिगतरीत्या मान्य नाही. कुणीही असो मी अशा भाषेला अजिबात मान्य करणार नाही. कुणीही असो, अशी भाषा वापरणे चुकीचे आहे.राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, सामान्यपणे, मला वाटते की, देशातील महिलांबाबत प्रत्येक पातळीवर आपल्या व्यवहारात सुधारणा होण्याची गरज आहे. मग कायदा आणि सुव्यवस्था असो वा आदरभाव असो. सरकार, व्यवसाय आणि कुठल्याही अन्य क्षेत्रात त्यांच्या स्थानाबाबत असो. देशातील महिला देशाचा गौरव आहे, त्याचे रक्षण झाले पाहिजे.दरम्यान, राहुल गांधी यांच्या विधानाबाबत कमलनाथ यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ते म्हणाले की, हे राहुल गांधींचे मत आहे. त्यांना मी कोणत्या संदर्भात बोललो होतो हे समजावून सांगण्यात आले असावे. मी कोणत्याबाबती हे विधान केले होते, हे मी आधीच स्पष्ट केले आहे.मात्र या विधानाबाबत माफी मागणार का असे विचारले असता मी का माफी मागावी असा प्रतिप्रश्न कमलनाथ यांनी केला. कुणाला अपमानित करण्याचा माझा हेतू नव्हता हे मी आधीच स्पष्ट केले आहे. आता जर कुणाला अपमानित झाल्यासारखे वाटत असेल तर त्याबाबत मला खेद आहे, असे ते म्हलणाले होते.मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेल्या कमलनाथ यांनी शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि डबरा विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुतील भाजपा उमेदवार असलेल्या इमरती देवी यांचे नाव न घेता आयटम असा उल्लेख केला होता. या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला असून, कमलनाथ यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारण