शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

"लढाई काँग्रेसविरुद्ध नाही, कोरोनाविरोधात आहे; हे मोदी सरकारने समजून घ्यावं", राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 3:09 PM

rahul gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सध्याची लढाई  कोरोनाविरोधात आहे, कोणत्याही राजकीय पक्षांविरोधात नाही, असे म्हणत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देदररोज तीन लाखांच्यावर नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, देशात अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे.

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, देशात अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. असे असले तरी कोरोनावरून देशातील राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कोरोनाच्या मुद्यांवरून एकमेकांवर टीका होताना दिसत आहे. यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सध्याची लढाई  कोरोनाविरोधात आहे, कोणत्याही राजकीय पक्षांविरोधात नाही, असे म्हणत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (congress leader rahul gandhi attacks modi government on corona virus issues sonia gandhi)

यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. "मोदी सरकारने हे समजून घेतले पाहिजे की, लढाई करोनाविरोधात आहे, काँग्रेस किंवा इतर राजकीय विरोधकांविरुद्ध नाही," असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. दरम्यान, याआधीही राहुल गांधी यांनी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. "रोजगार आणि विकासाप्रमाणे केंद्र सरकार कोरोनाची खरी आकडेवारी जनतेपर्यंत पोहचू देत नाही. महामारी नाही तर महामारीचे सत्य तर नियंत्रणात केलच आहे", असे ट्विट करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील आहे, अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 'दी इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या विशेष मुलाखतीद्वारे केली आहे. सोनिया गांधी यांनी कोरोनाविरोधातील लढाई ही 'आम्ही विरुद्ध तुम्ही' अशी नाही, तर ती आपण विरुद्ध कोरोना अशी आहे. ही लढाई देशाने एकजुटीने लढायची आहे, त्यासाठी राजकीय मतैक्य गरजेचे आहे, असे मत व्यक्त केलं आहे. त्याच अनुषंगाने आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा मोदी सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून आले आहे.

येत्या १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. यादरम्यान लस तयार करणाऱ्या कंपन्यांनी लसीच्या किंमतीची घोषणा केली आहे. या लसींच्या किमती वेगवेगळ्या जाहीर केल्या आहेत. यावरूनही राजकारण तापले आहे. यासंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या लस धोरणावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. यामध्ये लसींच्या वेगवेगळ्या किंमतीबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, असे म्हटले होते. 

('केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील', सोनिया गांधींची टीका )

कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतेय...भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, देशात अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख २३ हजार १४४ नवे रुग्ण तर २७७१ मृत्यूंची नोंद झाली. दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत बरे होणाऱ्यांचे प्रमाणही ३२ हजार ५५५ ने वाढले आहे. दिवसभरात २,५१,८२७ रुग्ण बरे झाले आहेत.

(CoronaVirus : 'भारतातील परिस्थिती विदारक', कोरोना संकटावर WHO च्या प्रमुखांनी व्यक्त केली चिंता)

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसSonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी