शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच, कॅबिनेट मंत्रिपदाचा पराभव करणाऱ्या आमदारानेही दिला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 22:20 IST

Arvind Ladani : अरविंद लडाणी यांनी भाजपामध्ये प्रवेश करून पोटनिवडणूक लढवण्याचा दावा केला आहे.

Arvind Ladani : सौराष्ट्र :  लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हे धक्के बसत आहेत. गुजरातमध्ये अर्जुन मोढवाडिया, मुलू भाई कंडोरिया आणि अंबरीश डेर या तिघांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेसचे नेते अरविंद लडाणी सुद्धा भाजपाच्या वाटेवर आहेत. दरम्यान, सौराष्ट्रातील जुनागढ जिल्ह्यातील माणावदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेले  अरविंद लडाणी यांनी बुधवारी विधानसभेचा राजीनामा दिला. तसेच, अरविंद लडाणी यांनी भाजपामध्ये प्रवेश करून पोटनिवडणूक लढवण्याचा दावा केला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे आमदार एकापाठोपाठ एक कमी होत आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होईपर्यंत राज्यातील काँग्रेसच्या आमदारांची संख्या मोठ्याप्रमाणात घटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माजी आमदार अंबरीश डेर यांनी मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर बुधवारी राजुला येथे शक्तीप्रदर्शन केले होते. तर आमदार अरविंद लडाणी यांनी भाजपाचे अध्यक्ष सीआर पाटील यांची येथे भेट घेतली आणि त्यानंतर गांधीनगरमध्ये जाऊन विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. 

याआधी सीजे चावडा, अर्जुन मोढवाडिया यांसारख्या दिग्गज काँग्रेस नेत्यांनीही काँग्रेस सोडली आहे. विशेष म्हणजे, अरविंद लडाणी यांनी गेल्या निवडणुकीत राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री जवाहर चावडा यांचा माणावदर मतदारसंघातून पराभव केला होता. जवाहर चावडा २०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले, नंतर त्यांनी राजीनामा दिला आणि भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर ते राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनले होते. दरम्यान, अरविंद लडाणी यांनी दावा केला आहे की, आपण लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असून माणावदरमधून पोटनिवडणूक लढवून पुन्हा आमदार होणार आहोत.

गुजरातमध्ये उद्या भारत जोडो न्याय यात्रा गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष शक्तिसिंह गोहिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा ७ मार्च रोजी दाहोद जिल्ह्यातील झालोद येथून गुजरातमध्ये दाखल होणार आहे. गुजरातमध्ये चार दिवसांच्या ४०० किलोमीटरच्या प्रवासात सभा, रॅली आणि जनसंपर्क करणार आहेत. तसेच, खासदार राहुल गांधी सरदार पटेलांनी स्थापन केलेल्या बारडोली स्वराज आश्रमाला भेट देणार आहेत.

टॅग्स :Gujaratगुजरातcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा