जब मुल्ला को मस्जिद मै राम नजर आया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 12:26 IST2019-06-19T12:22:26+5:302019-06-19T12:26:03+5:30

सभागृहात शपथविधी सोहळ्या दरम्यान ज्या घोषणाबाजी करण्यात आली तेदेखील योग्य नसल्याचं त्यांनी सांगितले. 

Congress leader Adhir Ranjan Chaudhary speech in Lok Sabha | जब मुल्ला को मस्जिद मै राम नजर आया...

जब मुल्ला को मस्जिद मै राम नजर आया...

नवी दिल्ली - नवीन खासदारांच्या शपथविधी दरम्यान संसदेत जय श्रीराम आणि अल्लाह हू अकबरचे नारे दिले जात होते त्यावर काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली. संसदेच्या सभागृहात अशाप्रकारे घोषणाबाजी योग्य नसल्याचं सांगत चौधरी यांनी सभागृहात कविता सादर केली. 

' जब मुल्ला को मस्जिद मै राम नजर आया, जब पुजारी को मंदिरे रहमान नजर आया, दुनिया की सुरत बदल जायेगी जब इंसान को इंसान मे इंसान नजर आये' अशी कवितेच्या माध्यमातून रंजन चौधरी यांनी सभागृहात भावना व्यक्त केल्या. 17 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी अभिनंदन प्रस्तावावेळी ते बोलत होते. 


यावेळी बोलताना रंजन चौधरी म्हणाले की, देशात सध्या शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न करेल अशी आम्हाला आशा आहे. लोकशाहीची प्रतिमा जपण्यासाठी काँग्रेसच्या खासदारांना सभागृहात चर्चा करण्यासाठी योग्य वेळ दिला जाईल असं मला वाटतं. मागील काही दिवसांपासून स्टॅडिंग कमिटीमध्ये कमी विधेयकं पाठवली जातात याकडे तुम्ही लक्ष द्याल. तसेच अध्यादेश आणून कायदे बनविण्याचा मार्ग अवलंबला जाऊ नये. तसेच सभागृहात शपथविधी सोहळ्या दरम्यान ज्या घोषणाबाजी करण्यात आली तेदेखील योग्य नसल्याचं त्यांनी सांगितले. 

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष डॉ. विरेंद्रकुमार यांनी ओम बिर्ला यांच्याकडे लोकसभा अध्यक्षपदाचा पदभार दिला. ओम बिर्ला यांच्या निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. तसेच, एका सर्वसामान्य कार्यकर्ता, विद्यार्थी संघटनांपासून चळवळीत जोडलेला कार्यकर्ता ते लोकसभा अध्यक्ष असा ओम बिर्ला यांचा प्रवास असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवेळीही नेहमीप्रमाणेच चर्चेत नसलेला चेहरा समोर आणला आहे. कोटा मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार बनलेल्या ओम बिर्ला यांना लोकसभेच्या अध्यक्षपदाचा बहुमान देण्यात आला. दरम्यान, खासदार बनण्यापूर्वी बिर्ला हे तीनवेळी दक्षिण कोटा मतदारसंघातून आमदार बनले होते. तर, पर्यावरणप्रेमी नेता अशी बिर्ला यांची ओळख आहे.  

Web Title: Congress leader Adhir Ranjan Chaudhary speech in Lok Sabha