शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

"राहुल गांधींच्या सुरक्षेला धोका"; भारत जोडो न्याय यात्रेबाबत खरगेंचं अमित शाह यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 11:38 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान आसाममध्ये झालेल्या घटनेबाबत काँग्रेसने राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. य़ाच दरम्यान आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. राहुल गांधींची सुरक्षा पुन्हा पुन्हा धोक्यात असल्याचं खरगे यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी आसाम पोलिसांवर आरोपही केले आहेत.

काँग्रेस अध्यक्षांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, मणिपूर ते मुंबई अशी 14 जानेवारीला सुरू झालेली भारत जोडो यात्रा आसाममध्ये पोहोचल्यानंतर असे काही प्रसंग आले की आसाम पोलिसांना राहुल गांधी यांच्या संरक्षण करण्यासाठी पुढे यायचं होतं, पण तसं झालं नाही. अरुणाचल प्रदेशातून काँग्रेसची यात्रा आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात परतली तेव्हा तेथील स्थानिक अधीक्षक, जे सीएम सरमा यांचे बंधूही आहेत, त्यांनी काँग्रेसच्या यात्रेवर भाजपा कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला प्रेक्षक म्हणून पाहिला, असा आरोप खरगे यांनी केला.

मल्लिकार्जुन खरगे असेही म्हणाले की, "भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोशल मीडिया टीम आणि पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्याशी झटापट केली आणि त्यांच्या गाडीवरही हल्ला केला. या लोकांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि वाहनांवरील यात्रेचे पोस्टरही फाडले."

"22 जानेवारी रोजी भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा ताफा नागाव जिल्ह्यात अडवला, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. या सर्व धक्कादायक घटनांदरम्यान, जेव्हा-जेव्हा भाजपाचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या जवळ येतात तेव्हा आसाम पोलीस प्रेक्षक म्हणून पाहत राहिले, त्यामुळे काही लोक राहुल गांधींची सुरक्षा तोडण्याचा प्रयत्न करत राहिले."

अमित शाह यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून यात्रा नियोजित प्रमाणे पार पाडावी, अशी मागणी खरगे यांनी केली. राहुल गांधी किंवा भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणारा काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता जखमी झाल्यामुळे यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा हस्तक्षेप आवश्यक आहे, असे ते म्हणाले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेAmit Shahअमित शाह