शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

काँग्रेसने CBI द्वारे मला कैदी बनविले, वकील काँग्रेसी असून माझ्यासाठी लढला; अमित शाहा आज बोललेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 23:19 IST

सोहराबुद्दीन एन्काऊंटर केस वारंवार चर्चेत येते. परंतू, अमित शाहा त्याची आठवण फार कमी काढतात. परंतू, आज शाहांनी तो प्रसंग बोलून दाखविला आहे. 

अमित शाहागुजरातचे मंत्री असताना त्यांना काँग्रेसच्या केंद्रीय राजवटीत तुरुंगात जावे लागले होते. यातून ते सहीसलामत सुटले. सोहराबुद्दीन एन्काऊंटर केस वारंवार चर्चेत येते. परंतू, अमित शाहा त्याची आठवण फार कमी काढतात. परंतू, आज शाहांनी तो प्रसंग बोलून दाखविला आहे. 

काँग्रेसने मला सीबीआयकडून तुरुंगात पाठविले. गुन्हा दाखल करायला लावला. एका मंत्रीपदावरून मी थेट कैदी झालो. अशावेळी काँग्रेसचाच एक वकील माझ्याबाजुने केस लढण्यासाठी पुढे आला, असे अमित शाहा म्हणाले. शाहा अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी हायकोर्टात निरुपम नानावटी यांनी कशी मदत केली याचा उल्लेख केला. 

दिव्यकांत नानावटी यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निरुपम हे त्यांचेच पूत्र आहेत. दिव्यकांत नानावटी हे दोनवेळा आमदार राहिले होते. त्यांच्या योगदानावर शाहा यांनी स्तुतीसुमने उधळली. 

पाच मिनिटांपूर्वी मी तुरुंगात मंत्री होतो, पाच मिनिटांनी मी कैद्यांतील एक झालो. माझ्यासाठी हा कठीण काळ होता. क्वचितच अशी कोणावर परिस्थिती ओढवली असेल. देवाने या जगात कोणाबरोबर असे केले नसेल परंतू माझ्यासोबत हे घडले. तेव्हा हेच निरुपम होते ज्यांनी तुलसीराम प्रजापती आणइ अन्य़ दोन एन्काऊंटर प्रकरणात वाचविले, असे शाहा म्हणाले. 

कशी झाली काँग्रेसी वकिलाची निवड...माझ्या अटकेनंतर काही वकील मित्र गुजरातमधील चांगल्या वकीलांच्या नावावर चर्चा करत होते. गुन्हेगारी कायद्याची जाण असलेला वकील हवा होता. निरुपम यांचेही नाव चर्चेत आले. परंतू, ते काँग्रेसचे सरचिटणीस झाले होते, त्यांची पार्श्वभूमी देखील काँग्रेसी होती. ते हा खटला लढतील का, असा प्रश्न आला त्यावर सर्वांचाच नकारात्मक टोन होता, असे शाहा म्हणाले. 

मला देखील वाटले की ते असे करणार नाहीत. परंतू, एकदा विचारायला काय जाते, असा विचार केला. माझ्या एका मित्राने त्यांच्याशी चर्चा केली. आम्हाला आश्चर्यच वाटले की ते खटला लढण्यास तयार झाले. नुसते तयारच नाही झाले तर ते लढले आणि सर्वोच्च न्यायालयात देखील जिंकण्यास मदत केल्याचे शाहा म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहGujaratगुजरातcongressकाँग्रेसCBIगुन्हा अन्वेषण विभाग