शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या अर्थव्यवस्थेला भूसुरुंगावर बसवून गेले होते काँग्रेस सरकार, नरेंद्र मोदींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 17:57 IST

काँग्रेस सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला भूसुरुंगावर बसवून गेले होते, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला

नवी दिल्ली  - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांच्या थकीत कर्जांसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला दोषी ठरवतानाच आपल्या सरकारने थकीत कर्जदारांना एक रुपयाचेही कर्ज दिले नसल्याचा दावा केला आहे. तसेच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना हे सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला भूसुरुंगावर बसवून गेले होते, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) चे उदघाटन केले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मोदींनी देशातील बँकिंग प्रणालीच्या सद्यस्थितीचा लेखाजोखा मांडतानाच काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, " थकबाकीदारांकडून पै पै वसूल करण्याचे काम सरकार करत आहे. यूपीए सरकारच्या काळात काही नामदारांना एका फोनवर सहा वर्षांमध्ये लाखो कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. जेव्हा आम्ही सरकार स्थापन केले. त्यानंतर काही दिवसांनी काँग्रेस या देशाची अर्थव्यवस्था भूसुरुंगावर ठेवून गेली आहे, असे आम्हाला वाटू लागले." 

 

यावेळी मोदींनी बँकांमधून करण्यात आलेल्या बेसुमार कर्जवाटपावरही बोट ठेवले. ते म्हणाले,  स्वातंत्र्यानंतर 2008 पर्यंत देशातील सर्व बँकांनी एकूण 18 लाख कोटींचे कर्जवाटप केले होते. मात्र 2008 पासून पुढच्या सहा वर्षांमध्ये हा आकडा वाढून 52 लाख कोटींपर्यंत पोहोचला. कर्ज घेऊन जा, नंतर मोदी येईल आणि रडारड करेल, असेच धोरण सुरू होते. म्हणजेच स्वातंत्र्यानंतर जितके कर्ज दिले गेले, त्याच्या दुप्पट कर्जवाटप गेल्या सरकारच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात दिले गेले,"  मात्र थकीत कर्जवसुलीसाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. थकबाकीदारांकडून पै पै वसूल केली जाईल. तसेच आमच्या सरकारच्या काळात अशा थकीत कर्जदारांना एक रुपयाचेही कर्ज दिले गेलेले नाही, असा दावाही मोदींनी केला.

 यावेळी पोस्टल बँकेच्या सुविधेचेही मोदींनी कौतुक केले. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या सुविधेमधून लोकांपर्यंत पोहोचणारे टपाल सेवक हे केवळ डिजिटल बँकरच नव्हे तर सर्वसामान्यांसाठी डिजिटल टिचर ठरतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तसेच गेल्या तिमाहीत देशाच्या विकास दरात झालेल्या वाढीबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण