भारतीय राष्ट्रीय काँग्रेसलादिल्लीतील २४, अकबर रोड येथील आपले ऐतिहासिक मुख्यालय आणि ५, रायसीना रोड येथील युवक काँग्रेसचे कार्यालय २८ मार्चपर्यंत रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या मालमत्ता विभागाने बुधवारी यासंदर्भात अधिकृत नोटीस बजावली असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
"इराण मान गया...!"; अमेरिकेनं युद्ध जिंकलं, मिळालं 'मौल्यवान गिफ्ट'! ट्रम्प यांचा मोठा दावा
हे कार्यालय गेल्या ४८ वर्षांपासून काँग्रेसच्या राजकीय हालचालींचे केंद्र राहिले आहे. गेल्या वर्षी काँग्रेसने कोटला रोडवर 'इंदिरा भवन' या आपल्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केले होते, मात्र जुन्या कार्यालयाचा ताबा अद्याप सोडलेला नाही. ऐन निवडणूक किंवा राजकीय धामधुमीच्या काळात आलेल्या या नोटीसमुळे काँग्रेस आता कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत आहे.
मालमत्ता विभागाने दोन्ही कार्यालये रिकामी करण्यासाठी २८ मार्च ही अंतिम तारीख दिली आहे.
दोन नोटीस
मुख्य कार्यालयासोबतच ५, रायसीना रोड येथील 'भारतीय युवक काँग्रेस'च्या कार्यालयालाही नोटीस मिळाली आहे.
काँग्रेसची भूमिका
पक्ष या जागेचे बाजारभावाप्रमाणे भाडे भरत असून, ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे.
न्यायालयीन लढाई
ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी ही नोटीस 'बेकायदेशीर' ठरवली असून, पक्ष याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.
काँग्रेस पक्ष शुक्रवारी किंवा त्याआधी या नोटिराविरुद्ध न्यायालयात स्थगिती मिळवण्यासाठी याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. तोपर्यंत या कार्यालयातून कागदपत्रांची हलवाहलव सुरू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Congress party received notice to vacate its Delhi headquarters at 24 Akbar Road by March 28. The property department issued the notice, causing political stir. Congress prepares for legal battle, claiming political vendetta and planning to challenge the notice in court.
Web Summary : कांग्रेस को 24 अकबर रोड स्थित दिल्ली मुख्यालय 28 मार्च तक खाली करने का नोटिस मिला। संपत्ति विभाग ने नोटिस जारी किया, जिससे राजनीतिक हलचल हुई। कांग्रेस कानूनी लड़ाई की तैयारी में है, राजनीतिक प्रतिशोध का दावा करते हुए अदालत में चुनौती देने की योजना है।