राजीव सातव यांच्या रिक्त जागेसाठी काँग्रेसकडून 6 नेत्यांची फिल्डींग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 06:38 AM2021-09-11T06:38:09+5:302021-09-11T06:38:59+5:30

राज्यसभेच्या या एका जागेसाठी काँग्रेसकडून 6 नेते इच्छुक आहेत. त्यासाठी, नेत्यांनी जोरदार फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे.

Congress fielding 6 leaders for Rajiv Satav's seat of rajyasabha | राजीव सातव यांच्या रिक्त जागेसाठी काँग्रेसकडून 6 नेत्यांची फिल्डींग

राजीव सातव यांच्या रिक्त जागेसाठी काँग्रेसकडून 6 नेत्यांची फिल्डींग

Next
ठळक मुद्देराज्याच्या विधानसभेच्या सदस्यांद्वारे निवडून द्यायच्या राज्यसभेच्या या जागांसाठी 15 सप्टेंबर, 2021 रोजी पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे.

नवी दिल्ली - भारत निवडणूक आयोगाने देशातील विविध कारणांनी रिक्त झालेल्या राज्यसभेच्या पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. स्व. राजीव शंकरराव सातव यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या राज्यातील एका जागेचाही यात समावेश आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील एका जागेसाठी काँग्रेसचे 6 नेते इच्छुक आहेत. त्यामध्ये, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांचाही समावेश आहे. 

राज्यसभेच्या या एका जागेसाठी काँग्रेसकडून 6 नेते इच्छुक आहेत. त्यासाठी, नेत्यांनी जोरदार फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये, मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, गुलाम नबी आझाद, मिलिंद देवरा, उत्तमसिंह पवार, अनंत गाडगीळ यांचा समावेश आहे. मात्र, गुलाम नबी आझाद यांना तामिळनाडू किंवा महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे.  

राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांद्वारे निवडून द्यायच्या राज्यसभेच्या या जागांसाठी 15 सप्टेंबर, 2021 रोजी पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे. दिवंगत सातव यांच्या निधनाने मुक्त झालेल्या जागेची मुदत 2 एप्रिल, 2026 पर्यंत आहे. या पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केल्याच्या दिनांकापासून बुधवार 22 सप्टेंबर, 2021 पर्यंत नामनिर्देशन दाखल करता येणार आहे. दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 सप्टेंबर रोजी केली जाणार असून उमेदवारांना सोमवार 27 सप्टेंबर, 2021 पर्यंत नामनिर्देशन मागे घेता येईल. 

4 ऑक्टोबरला होणार मतदान अन् निकाल

सोमवार दि. 4 ऑक्टोबर, 2021 रोजी सकाळी 9 वा. ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार असून त्याच दिवशी सायं. 5 वा. मतमोजणी केली जाणार आहे.
 

Web Title: Congress fielding 6 leaders for Rajiv Satav's seat of rajyasabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.