कर्नाटकमधील फोन टॅपिंगच्या चौकशीची काँग्रेसकडून मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 03:40 IST2019-08-16T03:39:42+5:302019-08-16T03:40:07+5:30
यापूर्वीच्या सरकारच्या काळात फोन टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप होत असून त्याबाबत चौकशी करण्याची मागणी अनेक काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

कर्नाटकमधील फोन टॅपिंगच्या चौकशीची काँग्रेसकडून मागणी
बेंगळुरू : यापूर्वीच्या सरकारच्या काळात फोन टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप होत असून त्याबाबत चौकशी करण्याची मागणी अनेक काँग्रेस नेत्यांनी केली आहे. एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारमध्ये काँग्रेसचा सहभाग होता.
भाजप सत्तेवर येताच हा वाद नव्याने चर्चेला आला असून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या म्हणाले की, कुमारस्वामी यांच्या सरकारच्या काळात फोन टॅपिंग झाले काय, याबाबत मला काही माहीत नाही.
भाजप सरकारने त्याबाबत तपास करून गुन्हेगारांना शिक्षा करावी. हनसूर येथील जद (एस) चे आमदार ए. एच. विश्वनाथ यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यांनी माझ्यासह ३०० पेक्षा जास्त आमदारांचे फोन टॅप आणि हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप करीत बुधवारी खळबळ उडवून दिली. दरम्यान, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आपल्या कारकिर्दीत फोन टॅपिंग झाल्याच्या आरोपांचा इन्कार केला आहे.
या घडामोडींकडे मी लक्ष देत आहे. मी मुख्य सचिव टी.एम. विजय भास्कर यांच्याशी चर्चा करून भविष्यातील पाऊल उचलणार आहे.
- बी.एस. येडियुरप्पा, मुख्यमंत्री