शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
5
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
6
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
7
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
8
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
9
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
10
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
11
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
12
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
13
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
14
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
15
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
16
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
17
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
18
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
19
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
20
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !

काँग्रेसनं हटवलं पक्षाचं अॅप; डेटा चोरीच्या भाजपाच्या पलटवारानंतर एक पाऊल मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 13:34 IST

या अॅपच्या सिंगापूर येथील सर्व्हरमधून ही माहिती चोरी होत असल्याचे भाजपाचे म्हणणे होते.

नवी दिल्ली: फेसबुकवरील माहितीचा गैरवापर होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसमधील 'डाटा'युद्ध आणखी तीव्र झाले आहे. कालच दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या अॅपच्या माध्यमातून डेटा चोरी होत असल्याचे आरोप केले होते. यानंतर सोमवारी सकाळी काँग्रेस पक्षाकडून प्ले स्टोअरमधून त्यांच्या पक्षाचे INC India हे अधिकृत अॅप्लिकेशन हटवण्यात आले. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरी होत असल्याचे भाजपाने म्हटले होते. या अॅपच्या सिंगापूर येथील सर्व्हरमधून ही माहिती चोरी होत असल्याचे भाजपाचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक पाऊल मागे घेत प्ले-स्टोअरवरून पक्षाचे अॅप्लिकेशन काढून टाकण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपवरील डेटाचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला होता. या अ‍ॅपवरील डेटा अमेरिकेत विकली जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यानंतर भाजपाने लगेच पलटवार केला व गांधी व काँग्रेसला तंत्रज्ञानाविषयी काहीही कळत नसल्याचेच यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचा टोमणा मारला होता. नमो अ‍ॅप वापरणाऱ्या असंख्य भारतीयांच्या डेटाचा गैरवापर केला जात असल्याचा दावा इलियट एल्डरसन या फ्रेंच हॅकरने केल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करुन पंतप्रधान मोदी ही माहिती अमेरिकन कंपन्यांना देत असल्याचा आरोप केला. जेव्हा राहुल गांधी यांच्या अनुयायांनी ट्विटरवर ‘डिलिटनमोअ‍ॅप' हा ट्रेंड शनिवारी सुरु केला त्याचा परिणाम उलटाच झाला. नमो अ‍ॅप डाऊनलोड करुन घेण्याचे प्रमाण व लोकप्रियता दोन्ही वाढले, असा दावाही भाजपाने केला.

 

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाBJPभाजपाcongressकाँग्रेस