शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

राहुल योग करत नसल्याने काँग्रेसचा पराभव; रामदेव बाबांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 06:30 IST

योग केल्याने ‘अच्छे दिन’ येतात; रामदेव बाबांचा दावा

मुंबई: काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व योग करत नसल्याने काँग्रेसचा पराभव झाला, असा दावा योगगुरू बाबा रामदेव यांनी येथे केला.आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी बाबा रामदेव यांनी बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी योगासनंही सादर केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी नियमित योग करतात. माजी पंतप्रधान नेहरू व इंदिराजीही कुणाच्या नकळत योग करायचे. मात्र काँग्रेसची नंतरची पिढी योगापासून दूर गेली व तिथेच त्यांची राजकारणातील गणितं बिघडली, असा टोला रामदेव यांनी लगावला. योग केल्याने ‘अच्छे दिन’ येतात असा दावाही त्यांनी केला.यावर्षी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त २१ जून रोजी मुख्य कार्यक्रम नांदेड येथे होणार असून मुख्यमंत्री फडणवीस व बाबा रामदेव उपस्थित राहाणार आहेत, अशी माहिती शिक्षण व क्रीडा मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिली. प्रधानमंत्री मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केला असून जगभरातील देश हा दिवस उत्साहाने साजरा करीत आहेत. स्वस्थ महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित नांदेड येथील कार्यक्रमास पतंजली योगपीठाचे सहकार्य मिळणार असून दीड लाखांपेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस राज्यातील ३६ जिल्हा मुख्यालय, ३२२ तालुका मुख्यालय मिळून ३५८ ठिकाणी साजरा होईल. या योग दिनामध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान ५ हजार विद्यार्थी सहभागी होतील, असे शेलार यांनी सांगितले.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाRahul Gandhiराहुल गांधीYogaयोगInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनcongressकाँग्रेस