शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 300 जागा जिंकू शकत नाही; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 10:00 IST

लोकसभेत बहुमत असलेले सरकारच कलम 370 हटवू शकते. 2024 च्या निवडणुका जिंकून काँग्रेसचे 300 खासदार संसदेत पोहोचतील, असे मला वाटत नाही.

नवी दिल्ली:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद(Ghulam Nabi Azad) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीबद्दल निराशाजनक दावा केला आहे. 'सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 300 जागाही जिंकू शकेल, असे मला वाटत नाही,' असे ते म्हणाले.

काँग्रेसची परिस्थिती बिकटबुधवारी जम्मू-काश्मीरच्या पूंछ येथे एका सभेला संबोधित करताना आझाद यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसची सध्याची परिस्थिती वाईट आहे. भविष्यातही आताची परिस्थिती कायम राहिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 300 जागा मिळतील, असे मला वाटत नाही. 370 चे प्रकरण प्रलंबित आहे. यावर सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच निर्णय घेऊ शकते. त्यामुळे मी तुम्हाला खोटी आशा दाखवणार नाही.

तुम्हाला खोटे वचन देणार नाही...गुलाम नबी आझाद पुढे म्हणाले की, फक्त तुम्हाला खूश करण्यासाठी जे आपल्या हातात नाही, त्यावर मी बोलणार नाही. मी तुम्हाला खोटी आश्वासने देणे, कलम 370 बद्दल बोलणे योग्य नाही. लोकसभेत बहुमत असलेले सरकारच कलम 370 हटवू शकते. सरकार स्थापन करण्यासाठी 300 खासदारांची गरज आहे. 2024 च्या निवडणुका जिंकून आमचे 300 नेते संसदेत पोहोचतील असे मी वचन देऊ शकत नाही. 2024 मध्ये आम्ही 300 जागांवर जाऊ असेही मला वाटत नाही. मी तुम्हाला कोणतेही चुकीचे वचन देणार नाही, असेही ते म्हणाले.

माझे भाषण चुकीच्या पद्धतीने दाखवलेजम्मू प्रांतातील किश्तवार जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना, ओमर अब्दुल्ला यांनी आझाद यांच्या कथित वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. आझाद यांनी कलम 370 बद्दल बोलणे व्यर्थ असल्याचे म्हटले होते. त्यावर आझाद म्हणाले की, माध्यमांनी काश्मीरमधील माझ्या भाषणाचे चुकीचे चित्रण केले आणि माझ्या त्या भाषणाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले. कलम 370 वर  आमची एकच भूमिका आहे, हे मी स्पष्ट करतो.  

 

टॅग्स :congressकाँग्रेसGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-एJammu Kashmirजम्मू-काश्मीर