शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 18:18 IST

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरुनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपाला मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एबीपी न्यूज आणि सीएसडीएस-लोकनितीनं संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारी भाजपासाठी चिंताजनक आहे. यंदाच्या वर्षाच्या अखेरीस राजस्थान आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाला मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. राजस्थानमध्ये भाजपाला मिळणारा पाठिंबा कमी होताना दिसतो आहे. विधानसभा निवडणुकीत 39 टक्के मतं मिळतील, असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 44 टक्के आणि अन्य पक्षांना 17 टक्के मतं मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 45.17 टक्के मतं मिळाली होती. तर काँग्रेसला 33.07 टक्के मतं मिळाली होती. याशिवाय अन्य पक्षांना 21.76 टक्के मतदान झालं होतं. 200 मतदारसंघ असलेल्या राज्यस्थानमध्ये सध्या भाजपाचे तब्बल 163 आमदार आहेत. मध्य प्रदेशातही भाजपाचं मोठं नुकसान होताना दिसत आहे. सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशात भाजपाला 34 टक्के, तर काँग्रेसला तब्बल 49 टक्के मतं मिळतील. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 44.88 टक्के, तर काँग्रेसला 36.38 टक्के मतं मिळाली होती. एकूण 230 जागा असलेल्या मध्य प्रदेशात सध्या भाजपाचे 165, तर काँग्रेसचे 58 आमदार आहेत. एबीपी न्यूज आणि सीएसडीएस-लोकनितीनं 28 एप्रिल 2018 ते 17 मे 2018 दरम्यान हे सर्वेक्षण केलं होतं.   

टॅग्स :BJPभाजपाRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस