शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

गुजरातशी नाते जोडण्यासाठी काँग्रेस-भाजपामध्ये चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 04:15 IST

अहमदाबाद : राज्यात निवडणूक प्रचारात आपणच गुजरातचे खरे प्रतिनिधी असल्याचे दाखविण्यासाठी भाजपा व काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.

- महेश खरे अहमदाबाद : राज्यात निवडणूक प्रचारात आपणच गुजरातचे खरे प्रतिनिधी असल्याचे दाखविण्यासाठी भाजपा व काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. भाषणाचे उत्तर भाषणाने आणि व्हिडीओचे उत्तर व्हिडीओने देत आम्हीच खरे गुजराती आहोत (हूं छूं गुजराती) असे पटवून सांगणे दोन्ही पक्षांतर्फे सुरू आहे.भाजपाने प्रचाराच्या माध्यमातून हूं छूं विकास, हूं छूं गुजराती (मी आहे विकास, मी आहे गुजराती) असा प्रचार व्हिडीओद्वारे चालवला असून, त्याला उत्तर म्हणून काँग्रेसने दोन व्हिडीओ जारी करून हंू छूं पाको गुजराती (मी आहे खराखुरा गुजराती) सांगण्यास सुरुवात केली आहे.भाजपाध्यक्ष अमित शहा कार्यकर्त्याकडे जेवतानाचे छायाचित्र तर राहुल गांधी हे काशाच्या भांड्यात चहा घेत असतानाचे छायाचित्र प्रचारात झळकत आहे. ‘विकासवेडा झाला आहे’ ही विरोधकांची टीकाही सोशल मीडियात चर्चेचा विषय आहे.‘आम्हाला गुजराती असल्याचा गर्व आहे,’ असे भाजपा सांगत आहे. पंतप्रधान मोदी व अमित शहा गुजराती असल्याचा फायदा भाजपा घेऊ पाहत आहे. सप्टेंबरपासून राहुल गांधी आणि मोदी यांच्या अनेक रॅली गुजरातमध्ये झाल्या. पण मोदी गुजरातीत बोलतात, तर राहुल गांधी यांची भाषणे हिंदीतील आहेत.काँग्रेसने एक व्हिडीओ आणला असून, यात वडील आपल्या मुलाला काँग्रेसच्या काळात आयआयएम, आयआयटी यांची स्थापना झाल्याचे सांगताना दिसत आहेत.>हार्दिक यांची पत्रकार परिषद रद्दबोताड विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या निवडीवरून पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी मंगळवारी आपली पत्रकार परिषद रद्द केली आहे. बोताडमधून काँग्रेसने राष्ट्रवादीचे बंडखोर नेते मनहर पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण, येथून दिलीप साबवा यांना उमेदवारी द्यावी, अशी पाटीदार समितीची मागणी आहे. काँग्रेसने रविवारच्या यादीत आणखी दोन पाटीदार नेत्यांना उमेदवारी दिली आहे.>समर्थकांना उमेदवारी : पहिल्या यादीनंतर पाटीदार समितीच्या नाराजीमुळे काँग्रसने हार्दिक पटेल यांच्या तीन समर्थकांना उमेदवारी दिली. यात ललित वसोया, अशोक जिरावाला यांचा समावेश आहे.>राजकोट पश्चिममधून उमेदवारी अर्ज दखल करणारे मुख्यमंंत्री विजय रूपाणी यांची संपत्ती ७.५१ कोटींवरून ९.०९ कोटी झाली आहे.>काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील राज्यगुरू यांच्या संपत्तीत १५ टक्के वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती २०१२मध्ये १२२ कोटी होती. ती आता १४१ कोटी एवढी झाली आहे.>शंभरी ओलांडलेले मतदार : एकट्या अहमदाबादमध्ये १०० वर्षे वा त्याहून अधिक वयाचे ६६२ मतदार आहेत. अहमदाबाद शहर व जिल्ह्यात ९० ते १०० या वयाचे ७,१८१ मतदार आहेत.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस