शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकल स्ट्राइकवरून काँग्रेस-भाजप भिडले; दिग्विजय सिंह म्हणाले, अद्याप पुरावा का दिला नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 09:14 IST

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबत सरकारवर जोरदार टीका केली आहे.

संजय शर्मा  नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबत सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकार सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलते की आम्ही इतके लोक मारले; मात्र त्याचा पुरावा मात्र अद्याप दिलेला नाही. हा प्रश्न उपस्थित केल्याने भाजपला पुन्हा एकदा देशभक्ती आणि सैन्याच्या अपमानाचा मुद्दा मिळाला आहे.

नऊ राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला घेरण्याचा मोठा मुद्दा दिग्विजय सिंह यांनी भाजपच्या हाती दिला आहे. एका सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्द्यावर तयार झालेल्या त्सुनामीच्या लहरीवर भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला ५२ जागांवर रोखले होते.

भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये अस्वस्थताएका आठवड्यानंतर ३० जानेवारीला भारत जोडो यात्रा समाप्त होत आहे. राहुल गांधी यांच्या या यात्रेने देशात तयार झालेले वातावरण आणि यात्रेत होत असलेली गर्दी यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. पुढील महिन्यात त्रिपुरा, मेघालय, नागालँडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या तीनही राज्यांत भाजपची परिस्थिती चांगली नाही. त्रिपुरात भाजपच्या हातून सत्ता जाऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या तीन राज्यांतील भाजप नेत्यांसोबत नुकतीच समीक्षा केली.

वक्तव्यामुळे कोंडीदिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष अस्वस्थ दिसत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पत्रकाराचा माइक दिग्विजय सिंह यांच्या चेहऱ्यासमोरून हटविल्याचे दिसून आले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे तयार झालेल्या वातावरणाचा काँग्रेसला फायदा घ्यायची वेळ आलेली असताना दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यामुळे कोंडी निर्माण झाली आहे. 

सैन्याचा पराक्रमावर सवाल नको : भाजप- सिंह यांच्या या वक्तव्यानंतर भाजपमध्ये उत्साह आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर आरोप करीत म्हटले आहे की, त्यांनी सैन्याचा अपमान करणे थांबवावे. - सैन्याचा पराक्रम आणि साहस यावर सवाल करू नयेत. भारतीय सैन्याच्या विरोधात बोलाल तर देश हे सहन करणार नाही.

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंह