अधिकार्‍यांच्या त्रासाची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करा

By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:11+5:302015-02-16T23:55:11+5:30

सहाय्यक आयुक्तांचा सल्ला : सिंहगड रोड व्यापारी असोसिएशनची बैठक

Complaint of the authorities' complaint to the bribe department | अधिकार्‍यांच्या त्रासाची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करा

अधिकार्‍यांच्या त्रासाची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करा

ाय्यक आयुक्तांचा सल्ला : सिंहगड रोड व्यापारी असोसिएशनची बैठक
पुणे : व्यापार व व्यवसाय करीत असताना किरकोळ व्यापार्‍यांनी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, व्यापार्‍यांनी कायद्याचे पालन करूनही महापालिकेचे अधिकारी अथवा कर्मचारी विनाकारण त्रास देत असतील तर त्यांची थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार करा, असा सल्ला पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश कांबळे यांनी सोमवारी दिला.
सिंहगड रोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने व्यापार्‍यांच्या प्रश्नांसंदर्भात माणिकबाग येथे सभा झाली. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कांबळे बोलत होते. या वेळी सिंहगड रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, नांदेडफाटा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष युवराज दळवी, आरोग्य विभागाचे अधिकारी किशोर एकल, सुहास पांढरे, आशिष सूपनार, अर्चना कदम, वाघजाई संघटनेचे उपाध्यक्ष अशोक साळेकर, उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, उत्तमनगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप तोडकर, वारजे व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा संगीता जाधव, किनारा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बोलोत्रा, कोथरूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनील गेहलोत आदी उपस्थित होते.
प्लास्टिकचा वापर आरोग्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत घातक आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करा. तसेच, कचर्‍याचे व्यवस्थापन नियमाप्रमाणे करा. त्यामुळे आपला परिसर व शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत होईल, असे कांबळे यांनी सांगितले.
चांगल्या कामासाठी संघटना नेहमीच व्यापार्‍यांच्या पाठिशी उभी राहते. संघटनेने नेहमीच वाईट गोष्टींचा निषेध केला आहे. महापालिका व इतर विभागांना व्यापार्‍यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. त्यामुळे अतिक्रमण आणि विनाकारण कारवाईच्या त्रासातून व्यापार्‍यांची सुटका करावी. ही कारवाई आकसापोटी होता कामा नये, असे आवाहन निवंगुणे यांनी केले.

(प्रतिनिधी)

Web Title: Complaint of the authorities' complaint to the bribe department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.