शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

हायमास्ट बसविण्यासाठी स्पर्धा स्मार्ट सिटी: वीज बचतीचा बोजवारा

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेसाठी शिफारस झाल्यावर अनेकांनी सोलापूर स्मार्ट बनण्यासाठी काय करता येईल, यावर विचार सुरू केला आहे. उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी कार्यालयात एलईडी दिवे बसविले तर नगरसेवक चेतन नरोटे यांनी सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून वॉर्ड स्मार्ट करण्याचा संकल्प केला, मात्र दुसरीकडे हायमास्ट दिवे बसविण्यासाठी स्पर्धा लागल्याचे चित्र दिसत आहे.

सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेसाठी शिफारस झाल्यावर अनेकांनी सोलापूर स्मार्ट बनण्यासाठी काय करता येईल, यावर विचार सुरू केला आहे. उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी कार्यालयात एलईडी दिवे बसविले तर नगरसेवक चेतन नरोटे यांनी सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून वॉर्ड स्मार्ट करण्याचा संकल्प केला, मात्र दुसरीकडे हायमास्ट दिवे बसविण्यासाठी स्पर्धा लागल्याचे चित्र दिसत आहे.
महापौर सुशीला आबुटे यांच्या प्रभागात आयटीआय पोलीस चौकी व नेहरूनगर येथे महामार्गाच्या मधोमध हायमास्ट दिवे बसविण्यासाठी खड्डे खोदून खांब उभे केले आहेत. विभागीय कार्यालयाने परस्पर हे काम हाती घेतले आहे. वीज विभागाला हायमास्ट दिवे उभारण्याच्या कामाची माहिती नसल्याचे सांगण्यात आले. विभागीय अधिकार्‍यांना दिलेल्या अधिकारात अशी कामे करून चार महिन्यांनंतर अहवाल सादर केला जातो. पण महामार्गावर असे दिवे बसविताना वीज विभागाची तांत्रिक मान्यता, प्रस्ताव, नियोजन व इस्टिमेट सादर करणे आवश्यक आहे. पण या नियमाला मूठमाती देऊन असे दिवे बसविण्याचा घाट घातला जात आहे. अशा अनेक दिव्यांचे प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे आहेत. एकीकडे स्मार्ट सिटी करण्यासाठी वीज बचतीसाठी एलईडी दिव्याचा 32 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे तर दुसरीकडे हायमास्ट दिवे बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. यातून मोठय़ा वीज बिलावर पैशाचा चुराडा होत आहे.
इन्फो..
अशी आहे दिव्यांची स्थिती
हायमास्ट छोटे: 138
हायमास्ट मोठे: 79
ट्युबलाईट: 10 हजार
हॅलोजन दिवे: 30 हजार
मासिक बिल: 85 लाख
इन्फो..
रात्रीला 385 रु. बिल
हायमास्ट दिवे दोन प्रकारचे आहेत. छोट्या हायमास्टच्या पोलची उंची 10 मीटर असते व त्यावर 4 हॅलोजन असतात. मोठय़ा हायमास्टमध्ये 12 मीटर उंचीचा पोल (दिवे: 8), 16 मीटर (दिवे: 12), 20 मीटर (दिवे: 12) असे प्रकार आहेत. 12 दिव्यांसाठी एका रात्रीत 385 रुपयांचे वीज बिल येते. वीज बचतीसाठी एलईडी दिव्यांचा प्रस्ताव आहे. पण अनेक जण या प्रस्तावाला न जुमानता वजन वापरून हायमास्टवर भर देत असल्याचे दिसून आले आहे.
कोट..
वीज बचतीसाठी एलईडी दिवे उपयुक्त आहेत. प्रत्येकाने स्वत:पासून सुरूवात करावी म्हणून मी माझ्या कार्यालयात स्वखर्चाने असे दिवे बसवून काटकसर केली आहे. हायमास्टवर अशा दिव्यांची योजना करता येणे शक्य आहे.
प्रवीण डोंगरे, उपमहापौर