कार्यकर्त्यांचे आबा (१)
By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:12+5:302015-02-16T21:12:12+5:30
कार्यकर्त्यांचे आबा

कार्यकर्त्यांचे आबा (१)
क र्यकर्त्यांचे आबानागपूरकरांचा गहिवर : असंख्य आठवणी अजय पाटील'सत्ता, संपत्ती येते आणि जाते पण जोडलेली माणसे आणि जीवाभावाचे मित्र, हीच आपली खरी संपत्ती असते असे मी मानतो अन् म्हणूनच मी आयुष्यभर माणसे जोडत आलो आहे', असे अभिमानाने सांगणारे व माणसे जोडण्याचे व्रत अविरत जपणारे आऱआऱ पाटील म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आबा आज नाहीत़ परंतु त्यांच्या सोबतच्या आठवणी मात्र माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यापासून तर सत्तेतील त्यांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांपर्यंत कुणालाही विसरता येणार नाहीत़ त्यांचे नागपूर-विदर्भावर विशेष प्रेम होते़ शासकीय वा पक्षाच्या कार्यक्रमासाठी आबा नागपुरात आले की अगदी घरच्यासारखे वागायचे़ राज्याचे उपमुख्यमंत्री असतानाही कधी तो बडेजाव त्यांनी मिरवला नाही़ आज त्यांच्या जाण्याने जुन्या आठवणी मनात दाटून आल्या आहेत. गडचिरोलीच्या दौऱ्यावरून परत येत असताना एका गावात महिला व दोन तीन नागरिक रस्त्यावर उभे होते. त्यांनी हात दाखविताच आबांनी गाडी थांबविली. पोलिसांनी लगेच गराडा घातला. गाडी थांबवणारी ती महिला शहीद जवानाची आई होती. आबांनी क्षणाचाही विलंब न करता तिचे सर्व म्हणणे ऐकून घेतले अन् सात दिवसात तिला न्याय मिळवून दिला़ दुसरी आठवण उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावरची़ त्यांना नागपूरला यायचे होते़ त्यांनी कळवले, मी सामान्य कार्यकर्त्यांचा नेता आहे. मी आमदार निवासात राहणार. एकदा गुडीपाढव्याच्या पूर्वसंध्येला आबा नागपुरात होते. त्यांना मी विचारले आबा तुम्ही निघणार आहात का? त्यावर आबा म्हणाले, तुझे घर माझेच आहे. येथेच गुढी उभारतो. सकाळी घरी आले अन् त्यांच्याच हाताने आम्ही गुढी उभारली.