शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअॅपवर 'बीफ'संदर्भात टिपण्णी करणा-या तरूणाचा पोलीस कोठडीत मृत्यू

By admin | Updated: October 12, 2016 10:41 IST

व्हॉट्सअॅपवर 'बीफ'संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या तरुणाचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

रांची, दि.12 - व्हॉट्सअॅपवर 'बीफ'संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या तरुणाचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याची घटना झारखंडमध्ये घडली. मिनाज अन्सारी असे त्या तरूणाचे नाव असून रविवारी राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ( RIMS) रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अटक केल्यानंतर पोलिसांनी मिनाजला जबर मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झालाचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र मिनाजच्या मेंदूला सूज आल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगच पोलिसांनी कुटुंबियांचे आरोप फेटाळून लावले.
दरम्यान हे प्रकरण हाताळण्यात हलगर्जीपणा दिसल्याने नारायण पोलीस स्टेशनचे  पोलीस उपनिरीक्षक हरीश पाठक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.  
पोलिसांच्या माहितीनुसार, झारखंडमधील दिगहारी गावात  2 ऑक्टोबर रोजी बीफच्या मुद्यावरून आक्षेपार्ह संदेश व्हॉट्सअॅपद्वारे पसरवण्यात येत होते. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी काही  जणांना ताब्यात घेतले, चौकशी करुन यापैकी काहींना सोडण्यात आले. मात्र, 3 ऑक्टोबर रोजी मिनाज अन्सारीला अटक करण्यात आली. यानंतर दोन दिवसांनी, पोलीस कस्टडीमध्ये जखमी झाल्याने मिनाजला उपचारांसाठी धनबाद येथील एका हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी मिळाली. त्यानंतर 7 ऑक्टोबरला त्याला  RIMS रुग्णालयात आणण्यात आले, आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.  दरम्यान, या प्रकरणी चौकशी सुरू आहे. मिनाजच्या मृत्यूमुळे परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.