आ. साधना सिंह यांना महिला आयोगाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 06:13 IST2019-01-22T06:13:38+5:302019-01-22T06:13:49+5:30

बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) प्रमुख मायावती ना महिला आहेत ना पुरुष, त्या तृतीयपंथीयांपेक्षाही वाईट आहेत, अशी असभ्य टीका केल्याबद्दल भाजपच्या आमदार साधना सिंह यांना राष्ट्रीय महिला आयोगाने सोमवारी नोटीस बजावली आहे.

Come on. Notice to Women Commission for Sadhna Singh | आ. साधना सिंह यांना महिला आयोगाची नोटीस

आ. साधना सिंह यांना महिला आयोगाची नोटीस

नवी दिल्ली : बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) प्रमुख मायावती ना महिला आहेत ना पुरुष, त्या तृतीयपंथीयांपेक्षाही वाईट आहेत, अशी असभ्य टीका केल्याबद्दल भाजपच्या आमदार साधना सिंह यांना राष्ट्रीय महिला आयोगाने सोमवारी नोटीस बजावली आहे.
ज्या सपा कार्यकर्त्यांनी मायावतींचा घोर अपमान केला होता, त्याच पक्षाशी त्यांनी केवळ सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवून युती केली. त्या महिला जातीसाठी कलंक आहेत, असे उद्गारही मुगलसराय येथील आमदार साधना सिंह यांनी शनिवारी काढले होते. आयोगाने म्हटले आहे की, जबाबदारीच्या पदांवर असलेल्या व्यक्तीबद्दल त्यांनी काढलेले उद्गार अयोग्य, अनैतिक व आक्षेपार्ह आहेत. त्यांच्या वक्तव्याचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, बसपाचे नेते के. सी. मिश्रा, काँग्रेसने निषेध केला आहे.

Web Title: Come on. Notice to Women Commission for Sadhna Singh