१९७१च्या भारत पाक युद्धावेळी बेपत्ता झालेला नवरा ४९ वर्षांनी जिवंत असल्याचं कळालं अन्... 

By पूनम अपराज | Published: December 16, 2020 02:48 PM2020-12-16T14:48:23+5:302020-12-16T14:49:09+5:30

1971 Indo - pak War : वास्तविक, सत्याचा नवरा मंगल सिंग १९६२च्या सुमारास भारतीय सैन्यात भरती झाला होता.१९७१मध्ये लान्स नाईक मंगल सिंगची रांची येथून कोलकाता येथे बदली झाली आणि त्यांची जबाबदारी बांगलादेशच्या मोर्चावर झाली.

Come to know that her husband, who went missing during the 1971 Indo-Pak war, is still alive after 49 years. | १९७१च्या भारत पाक युद्धावेळी बेपत्ता झालेला नवरा ४९ वर्षांनी जिवंत असल्याचं कळालं अन्... 

१९७१च्या भारत पाक युद्धावेळी बेपत्ता झालेला नवरा ४९ वर्षांनी जिवंत असल्याचं कळालं अन्... 

Next
ठळक मुद्देसत्या यांच्याबरोबर दोन मुलगेही ४९ वर्षे वडील मंगल सिंगच्या परत येण्याची वाट पहात आहेत. मंगल सिंगाचा मुलगा सेवानिवृत्त सैनिक दलजित सिंग म्हणाले की, गेल्या ४९ वर्षात मी माझ्या वडिलांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले. भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये युद्ध झाले होते. या युद्धानंतरच पाकिस्तान दोन भागात विभागला गेला आणि बांगलादेशचा जन्म झाला. हे युद्ध ३ डिसेंबर १९७१ रोजी सुरू झाले आणि हा संघर्ष १६ डिसेंबर १९७१ पर्यंत चालला. सैनिकी इतिहासात या युद्धाला ढाल ऑफ ढाका अ

जालंधरच्या दातार शहरातील ७५ वर्षीय सत्या देवी यांची गोष्ट सामान्य महिलांसाठी एक असामान्य उदाहरण आहे. १९७१च्या युद्धात तिचा नवरा मंगल सिंग बेपत्ता झाला होता आणि नंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याने अटक केली होती. त्यावेळी मंगल फक्त 27 वर्षांचा होता. सत्या देवीच्या पदरात दोन मुलगे होते. तेव्हापासून सत्याने पतीची प्रतीक्षा करण्यासाठी अनेक दशके घालवली आहेत, परंतु परराष्ट्र मंत्र्यांकडून नुकतेच प्राप्त झालेल्या पत्राने सत्याच्या आशा आता उंचावल्या आहेत. 


वास्तविक, सत्या देवी यांचा नवरा मंगल सिंग १९६२च्या सुमारास भारतीय सैन्यात भरती झाले होते.१९७१मध्ये लान्स नाईक मंगल सिंगची रांची येथून कोलकाता येथे बदली झाली आणि त्यांची जबाबदारी बांगलादेशच्या मोर्चावर झाली. काही दिवसांनंतर सैन्यातून एक टेलिग्राम आला की बांगलादेशात सैनिकांना नेणारी बोट बुडाली आणि मंगल सिंग यांच्यासह सर्व सैनिक मृत्युमुखी पडले. 


तेव्हापासून सत्या तिच्या नवऱ्याच्या परत येण्याची वाट पहात होता. मंगल याने सुटकेचा आग्रह धरला पण काहीच मदत मिळू शकली नाही. सत्या देवीने मुलांना मोठं करताना पतीची वाट पाहण्याची आशा सोडली नाही. कित्येक वर्षांनी भारत सरकारला अनेक पत्रे पाठविल्यानंतर, त्यांचे प्रयत्न संपले. आता ४९ वर्षानंतर, गेल्या आठवड्यात राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाकडून एक पत्र पाठवून, सत्याला पती जिवंत असल्याची आनंदाची माहिती मिळाली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, मंगल सिंग पाकिस्तानच्या कोट लखपत कारागृहात बंद आहे. पाकिस्तान सरकारशी बोलून त्यांच्या सुटकेला गती देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सत्या आणि त्यांचे दोन मुलगे गेली ४९ वर्षे मंगल यांना पाहण्याच्या प्रतीक्षेत आहेत, आता त्यांना लवकरच परत येण्याची आशा आहे आणि यासाठी त्यांनी सरकारला आवाहनही केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्र मिळाल्यानंतर सत्या देवी म्हणतात की, आता तिला आशा आहे की, तिचा नवरा पाकिस्तान तुरूंगातून सुटेल आणि आम्ही त्यांना भेटू शकू. पुढे ते म्हणाले की, मुलांना वाढविण्यात मला अनेक संघर्षांचा सामना करावा लागला परंतु मी कधीही हार मानली नाही. आता मला आशा आहे की, लवकरच माझा नवरा परत येईल.

सत्या यांच्याबरोबर दोन मुलगेही ४९ वर्षे वडील मंगल सिंगच्या परत येण्याची वाट पहात आहेत. मंगल सिंगाचा मुलगा सेवानिवृत्त सैनिक दलजित सिंग म्हणाले की, गेल्या ४९ वर्षात मी माझ्या वडिलांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले. पण अद्यापपर्यंत कोणतेही यश मिळू शकलेले नाही. ते म्हणतात की, १९७१ मध्ये मी फक्त ३ वर्षांचा होतो आणि तेव्हापासून माझ्या वडिलांच्या भेटीची वाट पाहत होतो. भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये युद्ध झाले होते. या युद्धानंतरच पाकिस्तान दोन भागात विभागला गेला आणि बांगलादेशचा जन्म झाला. हे युद्ध ३ डिसेंबर १९७१ रोजी सुरू झाले आणि हा संघर्ष १६ डिसेंबर १९७१ पर्यंत चालला. सैनिकी इतिहासात या युद्धाला ढाल ऑफ ढाका असेही म्हणतात.

Web Title: Come to know that her husband, who went missing during the 1971 Indo-Pak war, is still alive after 49 years.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.