शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 11:01 IST

लडाखमधील गलवान खोरे येथील सीमारेषेवर चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान तेलंगणातील कर्नल संतोष बाबू हे शहीद झाले.

नवी दिल्ली - भारत आणि चीन सैनिकांमध्ये 15 आणि 16 जून रोजी गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. लडाखमधील गलवान खोरे येथील सीमारेषेवर चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान तेलंगणातील कर्नल संतोष बाबू हे शहीद झाले. तेलंगणा सरकारने संतोष बाबू यांच्या पत्नी संतोषी यांना सरकारी नोकरी देऊ केली आहे. उपजिल्हाधिकारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शहीद झालेल्या कर्नल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांची पत्नी संतोषी यांना उपजिल्हाधिकारी पदाच्या नियुक्तीचं पत्र दिलं. 

के चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत की संतोषी यांची पोस्टिंग हैद्राबाद जवळील परिसरात होईल. संतोषी या आपल्या आठ वर्षांच्या मुलीसह आणि तीन वर्षांच्या मुलासह दिल्लीत राहत आहेत. संतोषी यांची आई हैद्राबादला राहते. कर्नल संतोष बाबू यांना वीरमरण आल्यानंतर तेलंगणा सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना 5 कोटी रुपयांची सन्मान निधी देण्याची घोषणा केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

शहीद कर्नल संतोष बाबू हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 105 व्या तुकडीचे विद्यार्थी होते. प्रबोधिनीत असतानाही त्यांची ओळख कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय कॅडेट म्हणून ओळख होती. संतोष यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी संतोषी, मुलगी अभिज्ञा आणि मुलगा अनिरुद्ध आहे. प्रबोधिनितील 'हट ऑफ रिमेम्बरन्स' या शहीद जवानांच्या स्मारकामध्ये सुवर्ण अक्षरात लिहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. 

देशासाठी मुलाने आपल्या प्राणाचे बलिदान दिले, मला त्याचा अभिमान आहे अशी भावना संतोष यांच्या आईने याआधी व्यक्त केल्या होत्या. तसेच आपला एकुलता एक मुलगा आता कधीच परत येणार नाही या गोष्टीचं दु:ख देखील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 'सुरुवातीला आम्हाला जेव्हा हे समजलं तेव्हा आमचा विश्वासच बसला नाही. खूप मोठा धक्का बसला. माझ्या मुलाने अनेक आव्हांनाचा सामना केला आहे' अशा भावना संतोष यांच्या पालकांनी व्यक्त केल्या. शहीद कर्नल संतोष यांची आई मंजुळा यांनी 'देशासाठी माझ्या मुलाने बलिदान दिले याचा मला अभिमान आहे पण एक आई म्हणून आज मी दु:खी आहे' असं म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : भयंकर! कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर कुटुंबाने पेटवून दिली रुग्णवाहिका

CoronaVirus News : कोरोना वॅक्सीन नेमकी कधी उपलब्ध होणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

Video - शाब्बास मित्रा, जिंकलंस! गाढवाची मुलाखत घेऊन पत्रकाराने मास्क न लावणाऱ्यांना शिकवला चांगलाच धडा

प्रियंका गांधी लवकरच सरकारी बंगला सोडणार, 'या' ठिकाणी राहायला जाणार

"वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज"; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

कौतुकास्पद! कोरोनावर मात केल्यानंतर चक्क उद्योगपतीने ऑफिसला बनवलं रुग्णालय, मोफत देतोय उपचार

कोरोनाचा फटका! नोकऱ्यांबाबत अपडेट देणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

CoronaVirus News : हवेतूनही होतो कोरोनाचा प्रसार; मास्कबाबत तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावTelanganaतेलंगणाIndiaभारत