शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सियाचीनवर तिरंगा फडकावणारे कर्नल नरेंद्र 'बुल' याचं निधन; लष्कर, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

By जयदीप दाभोळकर | Updated: January 1, 2021 16:01 IST

कर्नल नरेंद्र कुमार यांना देशातील प्रतिष्ठित नागरी सन्मानांपैकी एक पद्मश्री आणि याव्यतिरिक्त अर्जून पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 

ठळक मुद्दे१९५३ मध्ये ते सैन्य अकादमी देहरादून येथून कुमाऊं रेजिमेंटमध्ये दाखल झाले.त्यांना पद्मश्री आणि अर्जून पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

जगातील सर्वात उंच भाग असलेल्या सियाचिन ग्लेशिअरवर भारताची स्थिती मजबूत करत तिरंगा फडकावणारे कर्नल नरेंद्र 'बुल' कुमार यांचं गुरूवारी निधन जालं. ते ८७ वर्षांचे होते. लष्कराकडून याबाबत माहिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्करानं नरेंद्र बुल यांना श्रद्धांजली वाहिली. १९८४ मध्ये ऑपरेसन मेघदूतच्या वेळी त्यांनी अनेक मोहिमा पार पाडल्या होत्या. तसंच सियाचिनमधील पाकिस्तानच्या कुरापती रोखण्याचं मोठं कामही त्यांनी केलं होतं. कर्नल नरेंद्र कुमार यांच्या जन्म १९३३ मध्ये ब्रिटीशकालिन भारतील रावलपिंडी (सध्या पाकिस्तानात) येथे झाला होता. १९५० मध्ये ते भारतीय लष्करात दाखल झाले. तसंच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते कुमाऊं रेजिमेंटमध्ये रूजू झाले. भारतीय लष्करात ते 'कुमार बुल' या नावाने प्रसिद्ध होते. सियाचीनवरील महत्त्वाच्या लष्करी ठाण्याला ‘कुमार बेस’ असं नाव देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला. ३४ वर्षांच्या लष्करी सेवेनंतर ते निवृत्त झाले. त्यांना पद्मश्री, कीर्तिचक्र, अतिविशिष्ट सेवा पदक, तसेच अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यांनी सर्वात उंच समजलं जाणाऱ्या नंदादेवी शिखरावर तिरंगा फडकावला होता. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी शोक व्यक्त केला. "कर्नल नरेंद्र 'बुल' कुमार (सेवानिवृत्त) यांनी अतिशय साहसानं आणि मेहनतीनं देशसेवा केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो," असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. सालतोरो रेंज आणि लडाखच्या अन्य प्रदेशांवरील भारतीय लष्कराचं असलेलं वर्चस्व हे कर्नल नरेंद्र कुमार यांच्या साहसी मोहिमांचाच भाग आहे. लष्कराच्या इतिहासात त्यांचं नाव कायमच स्मरणात ठेवलं जाईल, असा विश्वास रावत यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागBipin Rawatबिपीन रावतNarendra Modiनरेंद्र मोदीSiachenसियाचिन