कोलंबो साखळी बॉम्बस्फोट : केरळमधून तीन युवक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 16:53 IST2019-04-28T16:52:13+5:302019-04-28T16:53:45+5:30
गेल्या रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि आसपासच्या परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासाची पाळेमुळे आता भारतापर्यंत पोहोचले आहेत.

कोलंबो साखळी बॉम्बस्फोट : केरळमधून तीन युवक ताब्यात
तिरुवनंतपुरम - गेल्या रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि आसपासच्या परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासाची पाळेमुळे आता भारतापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी भारतीय तपास यंत्रणेने तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. यापैकी दोन तरुणांना केरळमधील कासरगोड येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तर एका तरुणाला पलक्कड येथून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेल्या दोन तरुणांचा श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार जहरान हाशीमसोबत थेट संपर्क होता. दरम्यान, या तरुणांची एनआयएच्या मुख्यालयामध्ये चौकशी सुरू आहे. गेल्या रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे आठ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. श्रीलंकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरला होता.
NIA today carried out searches at three places in Kerala in connection with ISIS Kasaragod Module case. They are suspected to have links with some of accused in said case who left India to join terrorist organisation ISIS/ Daish. The 3 suspects are being questioned by NIA. pic.twitter.com/6bQtXkbIR8
— ANI (@ANI) April 28, 2019
दरम्यान, श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांनंतर तपास यंत्रणांना केरळमधील आयएस मॉड्युलवर संशय होता. तसेच आयएसबाबत सहानुभूती असणाऱ्यांना तपास यंत्रणांनी याआधीही ताब्यात घेऊन सोडले होते. मात्र या हल्ल्यानंतर या सर्वांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. तसेच श्रीलंकेमधील हल्ल्याचा मास्टरमाईंड जहरा हाशीम हा केरळ आणि तामिळनाडूमधील आयएसच्या कॅडरसोबत गेल्या तीन वर्षांपासून सोशल मीडियावरून संपर्कात होता.
Kerala: The searches by National Investigation Agency (NIA) in 2016 ISIS Kasaragod case were carried at the houses of three suspects, two in Kasaragod and one in Palakkad. https://t.co/Gk7wJQuPaQ
— ANI (@ANI) April 28, 2019