शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
3
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
4
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
5
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
6
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
7
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
8
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
9
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
10
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
11
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
12
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
13
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
14
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
15
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
16
Video - हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा
17
Mangala Thoke : शिकण्याची जिद्द! दिवसा घरकाम, रात्री अभ्यास; ६८ वर्षांच्या आजींनी ६०% गुणांसह पास केली बारावी
18
अमेरिकेत विमानाला अपघात, लँडिंग करताना हायवेवरील ट्रकला धडकलं आणि...; व्हिडीओ व्हायरल!
19
Samudrik Shastra: चेहरा बघून ओळखा स्वभाव! गोल, चौकोनी की अंडाकृती? काय सांगतो तुमचा 'फेस शेप'?
20
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

कोलमाफिया शेख समीरला खापरखेड्यात अटक

By admin | Updated: December 23, 2014 00:04 IST

मोस्ट वॉन्टेड : चंद्रपूर पोलिसांच्या हवाली करणार

मोस्ट वॉन्टेड : चंद्रपूर पोलिसांच्या हवाली करणार
नागपूर : चंद्रपूर पोलिसांना मोस्ट वॉन्टेड असलेला घुग्गुस येथील कोलमाफिया शेख समीर ऊर्फ राजू याला आज सायंकाळी खापरखेडा पोलिसांनी अटक केली. त्याला घुग्गुस (चंद्रपूर) पोलिसांच्या हवाली केले जाणार आहे.
शेख समीरने २ नोव्हेंबरला शगीर आणि त्याच्या भावाला चारवेळा फोन केले आणि एक महिन्यात जीवे मारेन, अशी धमकी दिली होती. हे फोन कॉल रेकॉर्ड करून शगीरने घुग्गुस पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तेव्हापासून घुग्गुस आणि चंद्रपूर पोलीस समीरचा शोध घेत होते. तो फरार असताना इकडे शगीरची नागपुरात हत्या झाली. त्यामुळे समीर या हत्याकांडाशी जुळला असल्याची चर्चा सर्वत्र होती. म्हणूनच समीरचा शोध घेण्यासाठी सीताबर्डी पोलिसांचे पथक घुग्गुस आणि चंद्रपूर येथे गेले होते. मात्र कुणाचे दडपण आले कळायला मार्ग नाही. पोलिसांनी या हत्याकांडात समीरचे नाव कागदोपत्री कुठेही लिहिले नाही. आज सायंकाळी शगीरचा भाऊ आणि काकाने नागपुरात पत्रकार परिषद घेतली आणि या हत्याकांडात समीरचा हात असल्याचा आरोप केला. तर तिकडे नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना कुख्यात समीर खापरखेड्यात माऊझर घेण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. डीवायएसपी चव्हाण यांनी शोधाशोध करून कुख्यात समीरला ताब्यात घेतले.
--
चंद्रपूर पोलीस घेणार ताब्यात
डॉ. आरती सिंह यांनी समीर शेखला पकडल्याची माहिती चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांना कळविली. त्यानुसार पोलिसांचे पथक नागपूरकडे निघाले असून, ते समीरला ताब्यात घेऊन घुुग्गुसला नेणार असल्याचे कळते.
---