College students in Chennai sit & climb on top of moving buses and hang from window bars of a bus during Bus Day celebrations | VIDEO: ब्रेक लावताच बससमोर कोसळली 20हून अधिक मुलं अन्...
VIDEO: ब्रेक लावताच बससमोर कोसळली 20हून अधिक मुलं अन्...

नवी दिल्लीः चेन्नईमध्ये एका बससमोर अचानक 20हून अधिक प्रवासी मुलं कोसळल्यानं अपघात होता होता टळला आहे. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी शाळा आणि कॉलेजेस उघडली आहेत. त्यामुळे भरलेल्या बसच्या टपावरून विद्यार्थी प्रवास करत होते. त्याचदरम्यान बसचालकानं ब्रेक मारला आणि लागलीच सगळी मुलं बससमोर येऊन कोसळली.

पोलिसांच्या माहितीनुसार, चेन्नईतल्या पच्चईअप्पास कॉलेजचे विद्यार्थी महानगर परिवहनच्या बस क्रमांक 40A मधून प्रवास करत होते. ती बस प्रवाशांनी खच्चाखच भरली होती. त्यामुळे काही प्रवासी टपावर जाऊन बसले. कंडक्टर आणि चालकाच्या विरोधाला न जुमानता ते छतावर जाऊन बसले आणि डान्स करू लागले. बस रस्त्यावरून धावत असतानाच अचानक समोर बाइक आली आणि बसचालकानं ब्रेक मारला, बसचालकानं ब्रेक मारताच टपावरची सर्वच मुलं खाली कोसळली.


जेव्हा घटनास्थळी पोलीस पोहोचले, तत्पूर्वीच ती मुलं घटनास्थळावरून पळून गेली होती. पोलिसांनी 13 आरोपींकडे विचारपूस केल्यानंतर त्यांना सोडून दिलं. कॉलेज सुरू झाल्यानं स्टंट करण्याचा मुलांची ही काही पहिलीच घटना नाही, पण अशाच घटना या जीवावर बेतत असतात.  

Web Title: College students in Chennai sit & climb on top of moving buses and hang from window bars of a bus during Bus Day celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.