शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमपत्र देण्यास नकार दिल्यानं आठवीतील विद्यार्थ्याला जिवंत जाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 09:57 IST

आरोपीला पोलिसांनी केली अटक

आंध्र प्रदेश: बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला जिवंत जाळल्याची घटना आंध्र प्रदेशातील अरधावीडूमध्ये घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रेमपत्र देण्यास नकार दिल्यानं बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं हे पाऊल उचललं. यामध्ये पीडित मुलगा 90 टक्के भाजला असून त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. या प्रकरणातील पीडित आणि आरोपी दोघेही अल्पवयीन आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवीत शिकणारा पीडित मुलगा दुपारी जेवत असताना आरोपी तिथे आला. त्यानं त्याला दहावीत शिकणाऱ्या एका मुलीला प्रेमपत्र देण्यास सांगितलं. मात्र पीडित मुलानं नकार दिला. त्यानं प्रेमपत्र फाडून टाकत याबद्दलची तक्रार मुख्याध्यापकांना देण्याची धमकी दिली. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. प्रेमपत्र देण्यास नकार दिल्यानं बारावीत शिकणारा विद्यार्थी संतापला. त्यानंतर तो शाळेच्या पार्किंगमध्ये गेला. तिथून त्यानं एका दुचाकीतील पेट्रोल बाटलीत भरलं. यानंतर तो विद्यार्थी प्रेमपत्र देण्यास नकार देणाऱ्या मुलाकडे आला. त्यानं त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं. पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी याबद्दलची तक्रार पोलिसांना दिली आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  

टॅग्स :fireआगAndhra Pradeshआंध्र प्रदेशStudentविद्यार्थीSchoolशाळा