पाटणा : बिहारमधील काही शाळांमध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत सामूहिकरीत्या कॉपी पुरविली जात असल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत पाटणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरत यापुढे असे गैरप्रकार खपवून घेऊ नये बजावले आहे.हाजीपूर येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना कॉप्या पुरविण्याच्या कामी त्यांचे पालक व आप्तगणांनी जीवाची बाजी लावली. तीन-चार मजली इमारतीवर चढण्यासाठी ते चक्क दोराला लटकत खिडकीपर्यंत जात असल्याची ब्रेकिंग न्यूज टीव्ही वाहिन्यांनी दाखविल्यानंतर एका इंग्रजी वृत्तपत्रातील संबंधित वृत्त हेच जनहित याचिका मानत मुख्य न्यायाधीश एल. नरसिंह रेड्डी आणि न्या. विकास जैन यांच्या खंडपीठाने बिहारच्या पोलिसांना हा गैरवापर तत्काळ थांबविण्याचा आदेश दिला.
सामूहिक कॉपी; सरकारला फटकारले
By admin | Updated: March 20, 2015 23:49 IST