तटरक्षक दलाच्या पोरबंदरमधील विमानतळावर हेलिकॉप्टरचा मोठा अपघात, ३ जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 14:19 IST2025-01-05T14:12:36+5:302025-01-05T14:19:44+5:30

Coast Guard Helicopter Crashes In Porbandar: गुजरातमधील पोरबंदर येथे असलेल्या तटरक्षक दलाच्या विमानतळावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. तटरक्षक दलाच्या एअर एन्क्लेव्हमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाल्याचं तर अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.

Coast Guard Helicopter Crashes In Porbandar: Major helicopter accident at Coast Guard airport in Porbandar, 3 dead | तटरक्षक दलाच्या पोरबंदरमधील विमानतळावर हेलिकॉप्टरचा मोठा अपघात, ३ जणांचा मृत्यू  

तटरक्षक दलाच्या पोरबंदरमधील विमानतळावर हेलिकॉप्टरचा मोठा अपघात, ३ जणांचा मृत्यू  

गुजरातमधील पोरबंदर येथे असलेल्या तटरक्षक दलाच्या विमानतळावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. तटरक्षक दलाच्या एअर एन्क्लेव्हमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाल्याचं तर अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच हा अपघात का झाला, या मागच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.  आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

या अपघाताबाबत माहिती देताना एका अधिकार्याने सांगितले की, भारतीय तटरक्षक दलाचं एक अत्याधुनिक हेलिकॉप्टर ध्रुव रविवारी नियमित प्रशिक्षणासाठी हवेत उड्डाण करत होतं. त्याचदरम्यान, त्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला. तसेच हे हेलिकॉप्टर गुजरातमधील पोरबंदर तटरक्षक दल विमानतळावर उतरत असताना दुर्घटनाग्रस्त झालं. या अपघातात हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच तटरक्षक दलाचं एक विमान समुद्रामध्ये दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या अपघातानंतर काही महिन्यातच पश्चिम किनारपट्टीवर ही दुर्घटना घडली आहे.    

Web Title: Coast Guard Helicopter Crashes In Porbandar: Major helicopter accident at Coast Guard airport in Porbandar, 3 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.