शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा घोटाळा : कंपनीच्या अधिकाऱ्यांना तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 09:05 IST

मनोजकुमार जयस्वालला चार वर्षे, रमेशकुमार जयस्वालला तीन वर्षे सश्रम कारावास

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : झारखंडमधील तीन कोळसा खाणींच्या वाटपाशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बुधवारी अभिजीत इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार जयस्वाल याला चार वर्षांच्या आणि तत्कालीन संचालक रमेशकुमार जयस्वाल याला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा बुधवारी सुनावली.

झारखंडमधील वृंदा, सिसाई आणि मेरल कोळसा खाणींच्या वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अरुण भारद्वाज यांनी नागपूर येथील अभिजित इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोळसा खाणींच्या वाटपासाठी भारत सरकारच्या केंद्रीय पोलाद मंत्रालयाची शिफारस आवश्यक असते. त्यासाठी दोषी व्यक्तींनी बनावट कागदपत्रे सदर खात्याला सादर केली होती.

फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवून ती सादर करणे या गुन्ह्यांसाठी मनोजकुमार जयस्वाल याला चार वर्षे, तर रमेशकुमार जयस्वाल याला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सीबीआय विशेष न्यायालयाने सुनावली, तसेच मनोजकुमारला १५ लाख, तर रमेशकुमारला २० लाख रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला. शिक्षेच्या आदेशानंतर, मनोजकुमारला तुरुंगात पाठवण्यात आले, तर चार वर्षांहून कमी कारावासाची शिक्षा सुनावलेल्या रमेशकुमारला ६० दिवसांसाठी जामीन मंजूर करण्यात आला. त्याला सीबीआय विशेष न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात अपील करता येणार आहे.

२०२० साली सीबीआयकडून आरोपपत्र nसीबीआय विशेष न्यायालयाने ९ डिसेंबर रोजी म्हटले आहे की, केंद्र सरकारला बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली, त्यावेळेस मनोज कुमारचे अभिजीत इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीवर नियंत्रण होते. nत्यानेच केंद्रीय पोलाद मंत्रालयाला रमेशकुमार जयस्वालच्या मार्फत बनावट कागदपत्रे सादर केली.nया पत्रांवर विसंबून पोलाद मंत्रालयाने अभिजित इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कोळसा खाणीचे वाटप करावे अशी शिफारस केली होती. या दोघांविरोधात सीबीआयने २९ ऑक्टोबर २०२० रोजी आरोपपत्र दाखल केले होते.

टॅग्स :Coal Allocation Scamकोळसा खाण घोटाळा