शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाणवाटप प्रकरण; विजय दर्डा, देवेंद्र दर्डा, माजी कोळसा सचिव गुप्ता निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 05:47 IST

दिल्ली विशेष न्यायालयाचा निकाल; फसवणूक, गुन्हेगारी कट, गैरवर्तणुकीचे आरोप सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नाही

पीटीआय / लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : कोळसा खाण वाटपाशी संबंधित प्रकरणात विशेष न्यायालयाने माजी खासदार विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा आणि केंद्रीय कोळसा खात्याचे माजी सचिव एच. सी. गुप्ता यांना दोषमुक्त केले. त्यांच्या विरोधात फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट किंवा गैरव्यवहाराचे आरोप सिद्ध करणारे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.

दहा वर्षांहून अधिक काळ चाललेला हा कायदेशीर लढा विशेष न्यायालयाच्या निकालामुळे संपुष्टात आला. विशेष सीबीआय न्यायाधीश सुनेना शर्मा यांनी मनोजकुमार जयस्वाल आणि मेसर्स एएमआर आयर्न ॲण्ड स्टील प्रायव्हेट लिमिटेड यांनाही दोषमुक्त केले.

विजय दर्डा, देवेंद्र दर्डा, मनोजकुमार जयस्वाल यांची तसेच मेसर्स एएमआर आयर्न ॲण्ड स्टील प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची बाजू वकील मुदित जैन, वकील युगांत शर्मा आणि वकील खोनीशा गणवीर यांनी न्यायालयात मांडली. सीबीआयने कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित ५० पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली होती. सध्याचे प्रकरण महाराष्ट्रातील बंदर कोळसा खाणीच्या वाटपासंदर्भात सीबीआयने दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रातून सुरू झाले.

सीबीआयचे सर्व आरोप  न्यायालयाने नाकारले

फिर्यादी पक्षाच्या मते, मेसर्स एएमआर आयर्न ॲण्ड स्टील प्रायव्हेट लिमिटेडने गुप्ता यांच्यासमवेत कट रचून, कोळसा खाणीच्या वाटपासाठी केंद्राच्या कोळसा मंत्रालयाला अर्जात खोटी माहिती सादर केली होती. तसेच महाराष्ट्रातून त्यावेळेस राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार विजय दर्डा यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्रे लिहून या कंपनीला कोळसा खाणीचे वाटप करावे अशी शिफारस केली होती असाही आरोप करण्यात आला होता. सीबीआयचे हे सर्व आरोप विशेष न्यायालयाने नाकारले. कोळसा वाटप प्रक्रियेदरम्यान सर्व माहिती अधिकाऱ्यांकडे आधीच उपलब्ध होती. प्रलोभन किंवा फसवणुकीच्या दाव्यांना कोणत्याही साक्षीदाराने दुजोरा दिलेला नाही असे निकालात म्हटले आहे.

आरोप सिद्ध करण्यात अपयश

विशेष न्यायालयाने निकालात म्हटले की, या प्रकरणात फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाच्या कटाचे आरोप फिर्यादी पक्ष सिद्ध करू शकलेला नाही. तसेच पुरावे आणि साक्षी तपासल्यानंतर, या आरोपांना पुष्टी मिळेल असे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. या प्रकरणाच्या सुनावणीत असे स्पष्ट झाले की मेसर्स एएमआर आयर्न ॲण्ड स्टील प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सादर केलेल्या अर्जात किंवा फीडबॅक फॉर्ममध्ये कोणतीही खोटी किंवा अप्रामाणिक हेतूने कोणतीही गोष्ट नमूद करण्यात आली असे सिद्ध करणारे पुरावे आढळले नाहीत.

पत्रांचा कोणताही प्रभाव नाही

न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणात कथित २४.६ कोटी रुपयांचे व्यवहार झाले हे सिद्ध झाले नाही. तसेच या देयकांचा कोळसा खाणीच्या वाटपाशी किंवा विजय दर्डा यांनी लिहिलेल्या पत्रांशी कोणताही संबंध सिद्ध झाला नाही. तसेच, दर्डा यांच्या पत्रांमुळे वाटप निर्णयावर प्रभाव टाकल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Coal scam case: Vijay Darda, Devendra Darda, Gupta acquitted.

Web Summary : Court acquits Vijay Darda, Devendra Darda, and H.C. Gupta in coal scam case. Lack of evidence for fraud or conspiracy led to their acquittal.
टॅग्स :Coal Allocation Scamकोळसा खाण घोटाळाVijay Dardaविजय दर्डाCourtन्यायालय