मंत्र्यांच्या भाषणासाठी मुख्यमंत्र्यांचे मुद्दे!
By Admin | Updated: August 13, 2015 22:34 IST2015-08-13T22:34:37+5:302015-08-13T22:34:37+5:30
मंत्र्यांच्या भाषणासाठी मुख्यमंत्र्यांचे मुद्दे!

मंत्र्यांच्या भाषणासाठी मुख्यमंत्र्यांचे मुद्दे!
म त्र्यांच्या भाषणासाठी मुख्यमंत्र्यांचे मुद्दे!मुंबई - स्वत: एक उत्कृष्ट वक्ते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय समारंभामध्ये मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात कोणत्या मुद्यांचा समावेश करावा, या विषयी मार्गदर्शन करणारे तीन पानी पत्र प्रत्येक मंत्र्यास पाठविले आहे. विशेषत: शेतकरी वर्गाच्या हितासाठी राज्य शासनाने जी पावले उचलली त्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी या पत्रात केला आहे. जलयुक्त शिवार योजना, आत्महत्याग्रस्त १४ जिल्ांमध्ये केल्या जात असलेल्या उपाययोजनाची माहिती पत्रात देण्यात आली आहे. संकटात सापडलेल्या शेतकर्यांना आधार देण्याचे काम राज्य शासन करीत आहे. शासनाचे हे निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण १५ ऑगस्ट रोजी जिल्ातील जनतेला संबोधित करतानाच्या भाषणात त्यांचा उल्लेख करावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. बळीराजासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची प्रत्यक्ष पाहणी मंत्र्यांनी करावी आणि या बाबत शेतकर्यांच्या भावना आपल्याला पत्राने कळवाव्यात असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या पत्रात दिले आहेत. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांनाही त्यांनी अशा सूचना केल्या आहेत. (विशेष प्रतिनिधी)-------------------------------प्रारंभ १५ ऑगस्टपासूनशेतीला शाश्वत सिंचन उपलब्ध व्हावे यासाठी राज्यात एक लाख विहिरी आणि ५० हजार शेततळी निर्माण करण्याच्या कार्यक्रमास १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील शेतकर्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्यवाटपही स्वातंत्र्यदिनापासून सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. ----------------------------------